ताज्या बातम्यासामाजिक

रेडे ग्रामपंचायतीची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात आघाडी

रेडे (बारामती झटका)

रेडे, ता. माळशिरस ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत माळशिरस तालुक्यात आघाडी घेतली आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेची सहा ऑगस्ट रोजी घोषणा झाल्यापासून ग्रामपंचायतीने नियोजन पूर्वक कामांना सुरुवात केली आणि अल्पवधीतच लक्षणीय यश मिळवलं आहे. 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. सभेदिवशी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे व भव्य वार्ड कर वसुली स्पर्धा या उपक्रमांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दर आठवड्याला ग्रामस्थांकडून श्रमदान
रेडे गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय परिसर, म्हसोबा मंदिर परिसर, बस स्टँड, स्मशानभूमी आदी ठिकाणी दर आठवड्याला ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून श्रमदान करण्यात येत आहे. यामुळे परिसर स्वच्छ होत आहे. या अभियानात सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी या टीमच्या एकत्रित प्रयत्नामुळे रेडे ग्रामपंचायतीने तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे.

दर शनिवारी दप्तराविना शाळा
रेडे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सहभाग घेतल्यापासून गावामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे हाती घेतले असून यासाठी ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार काळे, सरपंच सचिन काळे, उपसरपंच आनंद शेंडगे, सदस्य यांच्या संकल्पनेतून पुढची पिढी सक्षम व सज्ञान बनवण्याच्या दृष्टीने गावातील शाळांमध्ये दर शनिवारी ‘विना दप्तर शाळा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्रमामुळे मुलांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील वक्त्यांचे विचार ऐकण्यास मिळतील.

मुलांचे कौशल्य वाढण्यासाठी विविध निबंध स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. यासाठी ‘मि कसा घडलो’, या विषयावर नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच ‘माझा गाव काल, आज व उद्या’ या निबंध स्पर्धेच बक्षीस वितरण केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom