रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी माने देशमुख यांच्या वृंदावन शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये भोजनाचा आस्वाद घेतला..

वेळापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाने पंढरपूर-पुणे रोड वरून जाताना वेळापूर येथील भाजपचे नेते मदानसिंह माने देशमुख यांच्या हॉटेल वृंदावन शुद्ध शाकाहारी या हॉटेलवर ना. भरतशेठ गोगावले व त्यांच्या समवेत असलेल्या लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे सांगोला दौरा आटोपून माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील उमलते युवा नेतृत्व विक्रम उर्फ सोनू पराडे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आलेले होते. त्यांच्या दौऱ्यात हॉटेलचे मालक भाजप नेते मदनसिंह माने देशमुख होते. त्यामुळे रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांचा सन्मान हॉटेलचे मॅनेजर शुभम माने यांनी केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



