रोटरी गावोगावी जाऊन कॅन्सरचे तपासणी करणार
श्रीपुर (बारामती झटका)
रोटरी ग्लोबल ग्रँडच्या माध्यमातून “रोटरी आशा एक्सप्रेस” या आधुनिक कॅन्सर तपासणी बसचा लोकार्पण सोहळा कृष्णा विश्व विद्यापीठ येथे संपन्न झाला. ही बस सोलापूर, सातारा, लातूर, संभाजीनगर या जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन महिलांची कॅन्सर तपासणी करणार आहे. त्यावेळी कृष्णा विद्यापीठ कराडचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, रोटरी गव्हर्नर डॉ. मुकुंद चित्रावार, रोटरी डिस्टिक गव्हर्नर स्वाती हेरकळ, डॉ. प्रेरणा ढोबळे, संतोष निकम, मदन मोरे, दीपक बागडे, प्रमोद शिंदे, ओजस दोभाडा, कल्पेश पांढरे, नितीन कुदळे, नवनाथ नागणे, दीपक फडे, केतन बोरावके, राजीव बनकर, जयदीप बोरावके, संदीप लोणकर आदी रोटरीयन उपस्थित होते.
रोटरीने मे महिन्यातील मातृदिनाच्या पूर्वसंध्येला लाखों मातांची कॅन्सर पूर्व तपासणीसाठीची गरज ओळखून, लोकांचे या तपासणी बाबतचे असलेले गैरसमज आणि भीती विचारात घेऊन लवकर निदान होणे आणि त्यासंबंधीची जनजागृती करणे यासाठी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून रोटरी आशा एक्सप्रेस या बसची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यात आली.
बसवर लावलेल्या मोठ्या टीव्हीद्वारे जनमाणसांमध्ये स्वयं तपासणी, घ्यावयाची काळजी आणि उपचारांचे स्वरूप यासाठीच्या चित्रफिती दाखविण्यात येतील.
गावागावांमध्ये ही रोटरी आशा एक्सप्रेस एक नवीन जागृती निर्माण करेल, तसेच जर काही निदान झाले तर त्यावर मोफत उपचार सुद्धा केले जातील. द रोटरी फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वालसॅल (इंग्लंड), रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ आणि यूके मधील ६ रोटरी डिस्ट्रिक्टस आणि रोटरी क्लब कराड व अकलूज यांनी एकत्र येवून काम केले आहे.
रोटरी आशा एक्सप्रेस रोटरी डिस्टिक गव्हर्नर स्वाती हेरकळ, डॉ. मुकुंद चित्रावार यांनी ग्लोबल ग्रँडमधून ५५ लाख खर्च करून आधुनिक चार बसेस तयार केलेल्या आहेत. त्यात सातारा, सोलापूर, लातूर, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये या बसच्या माध्यमातून महिलांची कॅन्सर तपासणी होणार आहे. त्यात स्तन कॅन्सर, तोंड, नाक, कान, घसा तसेच संपूर्ण शरीरातील कॅन्सरची तपासणी होणार आहे. कॅन्सर तपासणीसाठी लागणार्या आधुनिक सुविधा या वातानुकूलित बसमध्ये देण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.