ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने ११ शिक्षकांना राष्ट्र निर्माण सेवा पुरस्कार प्रदान

अकलूज (बारामती झटका)

रोटरी क्लब अकलूज यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा राष्ट्र निर्माण पुरस्कार हा शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील 11 शिक्षकांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू आणि सहाय्यक प्रांतपाल ॲड. विशाल बेले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यंदाचा राष्ट्र निर्माण पुरस्कार वितरण सोहळा माळेवाडी, अकलूज येथे संपन्न झाला. यामध्ये माळशिरस तालुक्यातील अकरा शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये दिलीप उकिरडे, अशोक राजगुरू, योगेश गुजरे, महेश पोरे, राजीव देवकर, किशोर शिंदे, अवधूत केमकर, बाळासाहेब शिंदे, शाहिन शिकलगार, श्रीमती सविता कोटमाळे, बाळासाहेब नवगिरे यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब अकलूजच्या अध्यक्षा सौ. प्रिया नागणे, सचिव मनिष गायकवाड, खजिनदार शशील गांधी, संचालक नितीन कुदळे, नवनाथ नागणे, मकरंद जामदार, बबनराव शेंडगे, अजित वीर, दीपक फडे, केतन बोरावके, संदीप लोणकर, स्वराज फडे, आशिष गांधी, कल्पेश पांढरे, सौ. तृप्ती कुदळे, डॉ. अभिजीत मगर तसेच सदस्य प्रवीण कारंडे, गजानन जंवजाळ, अजिंक्य जाधव, राजीव बनकर, पोपट पाटील, बापू चव्हाण, आशा शेख, हेमलता मुळीक आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी नवनिर्वाचित 10 सदस्यांनी रोटरी क्लब अकलूजशी जोडून रोटरीची शपथ घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास ऊरवणे यांनी केले तर आभार मनिष गायकवाड यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button