सदाशिवनगर येथे श्री दत्त मंदिरात गुरुचरित्र पारायणाला सुरुवात…

सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर, ता. माळशिरस येथे पुणे-पंढरपूर रोडवर शेती महामंडळाच्या जागेमध्ये पावन श्री दत्त मंदिर आहे. श्री दत्त मंदिरामध्ये गुरु पौर्णिमेदिवशी गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होईल अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे.

सदरच्या गुरुचरित्र पारायणासाठी सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम, प्रज्योत तात्या सालगुडे मित्र मंडळ अध्यक्ष महादेव भोसले, सागर महामुनी, लखन सूर्यवंशी, संजय पंडित, अजिनाथ वाघमोडे, पृथ्वीराज पंडित असे पारायणास वाचक बसलेले आहेत. सर्वांनी भगवे वस्त्र परिधान करून अंगावर दत्त महाराजांचे भस्म लावलेले आहे. अंगारा, धूप, उदबत्ती यांच्या वासाने परिसर पवित्र झालेला असून समईच्या तेजाने उजळून निघालेला आहे.


श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुसज्ज अशा पद्धतीने रचना केलेली आहे. सदरचे मंदिर 1983 सालापासून आहे. सदरच्या मंदिराचा जीर्णोद्धार श्री दत्त भक्तांनी केलेला आहे. सदरच्या ठिकाणी बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे, वृक्षारोपण केलेले आहे. दर गुरुवारी सदरच्या ठिकाणी अन्नदान केले जाते. दिवसेंदिवस श्री दत्त मंदिराचे महात्म्य वाढत आहे. गुरुपौर्णिमा दिवशी गुरुचरित्र पारायण समाप्त होणार आहे. सदरच्या दिवशी महाप्रसादासाठी भाविकांनी लाभ घ्यावा, असे गुरुचरित्र पारायण करणारे भाविकभक्त यांची इच्छा व मनोकामना आहे.
यावेळी सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम, महादेव भोसले, प्रज्योत तात्या सालगुडे पाटील मित्र मंडळ अध्यक्ष, सागर महामुनी, लखन सूर्यवंशी, संजय पंडित, आजिनाथ वाघमोडे, पृथ्वीराज पंडित आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



