सदाशिवनगर मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर ता. माळशिरस येथे श्री शंकर सहकारी साखर कारखाना, कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, ज्युनिअर कॉलेज सदाशिवनगर, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा, सदाशिवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहन कारखान्याचे संचालक महादेव शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते इ. १० वी व १२ वी मध्ये नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुलांनी कवायत कार्यक्रम सादर करून सुंदर संचलन केले. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.
यावेळी कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक, व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, जि. प. शाळा मुख्याध्यापक व त्यांचा सर्व शिक्षक वर्ग, कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजित डुबल, सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळेचे प्राचार्य विजय निंबाळकर सर व त्यांचा सर्व शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या गरजु विद्यार्थ्यांना ६१ ड्रेसची मदत ऋषिकेश बनसोडे यांनी केली. त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले यांनी अर्जुनसिंह मित्र मंडळाच्या वतीने शाळेचे दोन विद्यार्थी दत्तक घेतले, त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काशीद सर व पाचपुंड मॅडम यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.