सदाशिवनगर येथील श्रीमती शेवंताबाई ढोबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

सदाशिवनगर येथील सुप्रसिध्द डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांना मातृषोक
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर, ता. माळशिरस येथील श्रीमती शेवंताबाई जगन्नाथ ढोबळे यांचे आज मंगळवार दि. ५/८/२०२५ रोजी रात्री ९.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सदाशिवनगर येथील सुप्रसिध्द डॉ. श्री. ज्ञानेश्वर जगन्नाथ ढोबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.
स्व. शेवंताबाई ढोबळे यांची अंत्ययात्रा बुधवार दि. ६/८/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता राहत्या घरापासून (सदाशिवनगर) स्मशानभूमी पर्यंत निघणार आहे.

श्रीमती शेवंताबाई ढोबळे यांच्या दुःखद निधनाने ढोबळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर ढोबळे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो व त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



