सद्गुरु श्री श्री कारखान्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साही वातावरणामध्ये ध्वजवंदन”
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
सांगली-सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपाशीर्वादाने व शेतकरी वर्गाच्या आणि सभासद बांधवांच्या विश्वासावरती गेली तेरा वर्षे सुरू असलेल्या सद्गुरु श्री श्री साखशर कारखान्यावरती मा. एन. शेषागिरीराव सर यांचे हस्ते व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालिका उषाताई मारकड व सर्व खाते प्रमुख यांच्या समवेत कर्मचारी, कामगार यांचे उपस्थितीमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रगीत आणि ध्वजगीतानंतर मा. चेअरमन एन. शेषागिरीराव सर यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे व्हा. चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालिका उषाताई मारकड, प्रमुख वक्ते सेवानिवृत्त शिक्षक शेंडगे सर, जनरल मॅनेजर रामाराव, डी. जी. एम. प्रभाकर रावल, एच. आर. अँड ॲडमिन सचिन खटके यांचे उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रीय मनोगताचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रभाकर रावल यांनी प्रास्ताविकातून कारखान्याच्या कार्यासंबंधी सविस्तर माहिती दिली.
आपल्या मनोगतामध्ये प्रा. शेंडगे सर (सेवानिवृत्त, गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस) यांनी या कार्यक्रमामध्ये सद्गुरु कारखान्याबाबत व सर्व कार्याविषयी प्रशंसा केली व स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रप्रेम कसे जोपासावे याबाबत आपले विचार व्यक्त केले. केन मॅनेजर सुनील सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले. व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी आपल्या देशाविषयी आपण कसे प्रेम जोपासले पाहिजे व प्रत्येक भारतीयांमध्ये देशाविषयी आपुलकी निर्माण होईल या पद्धतीने आपण सुद्धा वागले पाहिजे, अशा प्रकारचे विचार आपल्या मनोगतातून उपस्थितांना व्यक्त केले.
तर अध्यक्षीय भाषणातून चेअरमन मा. शेषागिरीराव सर यांनी आपल्या हाती घेतलेले कोणतेही काम प्रामाणिकपणे करणे ही सुद्धा देशसेवाच असते, आणि ती आपण प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे, अशा प्रकारचे विचार उपस्थितांसमोर व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये सद्गुरु श्री श्री इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागातील लोप पावत चाललेला परंतु, आरोग्याच्या दृष्टीने सर्वांना उपयोगी असणाऱ्या लेझीम या मैदानी खेळाने सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. तर लहान लहान बालकांनी व्यक्त केलेल्या मनोगताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्याचे दिसून आले.
सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य नागेश शिरकांडे सर तर क्रीडाशिक्षक वनवे सर आणि त्यांच्या सहकारी स्टाफने परिश्रम घेतल्याचे समजते. कार्यक्रमाचे आभार सत्यनारायण रेड्डी यांनी मानले तर सूत्रसंचालन रघुनाथ देवकर यांनी केले. सर्व उपस्थित विद्यार्थी वर्गांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर उपस्थित ग्रामस्थ, पालक, सभासद बांधव यांना अल्पोपहार देण्यात आला. एकंदरीत सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर एकेकाळच्या माळरानावरती सद्गुरु परिवाराच्या रूपाने सांस्कृतिक कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणामध्ये मनोरंजन अधिक राष्ट्रीय प्रेम जागृत झाल्याचे बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.