ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सहकार महर्षींनी सहकाराची पंढरी म्हणून ओळख निर्माण केलेली, स्वाहाकाराकडे नेतृत्वाअभावी वाटचाल…

रणजीतदादांनी डीसीसी बँकेत कळस चढवला, असे बोलले जाते तर दादांचेच बगलबच्चे चढवलेल्या कळसावर बगळे विष्टा टाकून घाण करीत आहेत…

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते उजाड माळरानाचे नंदनवन करून अकलूज माळशिरस तालुक्याची महाराष्ट्रामध्ये सहकाराची पंढरी म्हणून ओळख निर्माण करणारे सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य काम केलेले आहे. कारखाना, कुकुटपालन, शिक्षण संस्था, दूध उत्पादन, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ अशा अनेक विकास सेवा सोसायटी सहकारी संस्थाचे जाळे उभा करून माळशिरस तालुका सुजलाम सुफलाम केलेला आहे. सदरचा सहकार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी टिकवला मात्र, तिसऱ्या पिढीकडून सहकार महर्षींनी सहकाराची पंढरी म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्वहाकाराकडे नेतृत्वाअभावी वाटचाल सुरू असल्याची सहकार क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे.

माळशिरस तालुक्यातील कारखाना, दूध संघ, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, कुक्कुटपालन या संस्थांची काय अवस्था आहे, हे तालुक्यासह जिल्ह्याला माहित आहे. याविषयी जास्त काही लिहिणार नाही मात्र, शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते. सदर बँकेचे चेअरमनपद सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. दादांच्या समर्थकातून चेअरमन पदाच्या कार्यकालात डीसीसी बँकेत कळस चढवला. ठेवी वाढवल्या, सभासदांना कर्ज वाटप केले, सर्वसामान्यांची बँक अशी ओळख निर्माण केली, अशा वल्गना केल्या जात आहेत. रणजीतदादांनी डीसीसी बँकेत कार्यकर्त्यांच्या म्हणण्याने कळस चढवला असला तर दादांचेच डीसीसी बँकेतील बगलबच्चे चढवलेल्या कळसावर बगळे विष्टा टाकून घाण करीत आहेत, अशी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रतिमा मलीन झालेली आहे..

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बनावट सोन्यावर खरे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. यामध्ये अधिकारी, सोनार व सभासद यांच्या संगनमताने गैरव्यवहार झालेला आहे, अशी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी माळशिरस तालुक्यातील चार शाखा अधिकारी यांना निलंबित करून चौकशीसाठी सोलापूर येथे हजर ठेवलेले आहे.

माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवीदार खातेदार व कर्जदार यांचा विश्वास उडू नये, यासाठी तालुका अंतर्गत बदल्या केलेल्या आहेत. मात्र दादांचे बगलबच्चे आपल्या फायद्याचे कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दादांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे माळशिरस तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अधिकारी व कर्मचारी पदावर अनेक वर्ष एकाच ठिकाणी व आपण ज्या गावात वास्तव्यास आहे त्याच गावात राहण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे. गावामध्ये शाखेत कार्यरत असताना बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये घरचा कार्यभार सांभाळता येतो. वरिष्ठांनी भेटी दिल्यानंतर दादांचा आशीर्वाद आडवा येतो यासाठी दादांनी आता निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे गावाच्या बाहेर किंवा गावाच्या जवळ कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने केलेल्या आहेत. सदरच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांना हजर होण्याच्या सूचना कराव्या अशी तालुक्यात व जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी पी. डी. देशमुख शाखा अधिकारी यशवंतनगर शाखा येथून शाखा अधिकारी माळशिरस शहर शाखा येथे, एम. आर. वाघ शाखा अधिकारी माळशिरस शहर शाखा (अंडर ट्रान्स्फर) येथून शाखाधिकारी यशवंतनगर शाखा येथे, जी. एस. लावंड जुनिअर ऑफिसर यशवंतनगर शाखा (कॅश कामकाज) येथून शाखा अधिकारी वाघोली शाखा येथे, एल. के. भोई शाखा अधिकारी वाघोली शाखा येथून जूनियर ऑफिसर यशवंतनगर शाखा (कॅश कामकाज) येथे एम. एस. गायकवाड शाखाधिकारी निमगाव मगराचे शाखा (अंडर ट्रान्स्फर) येथून शाखाधिकारी खंडाळी शाखा येथे आर. एम. थोरात शाखा अधिकारी खुडूस शाखा (अंडर ट्रान्स्फर) शाखाधिकारी निमगाव मगराचे शाखा येथे ,व्ही. बी. पवार शाखाधिकारी खंडाळी शाखा येथून शाखाधिकारी खुडूस शाखा येथे, बी. बी. गोरे बँक इन्स्पेक्टर फोंडशिरस/मांडवे शाखा येथून बँक इन्स्पेक्टर नातेपुते मोरोची शाखा येथे आर. एस. निकम बँक इन्स्पेक्टर नातेपुते/मोरोची शाखा येथून बँक इन्स्पेक्टर फोंडशिरस मांडवे शाखा येथे, व्ही. जे. लोंढे लिपिक धर्मपुरी शाखा येथून लिपिक फोंडशिरस शाखा येथे, एस. बी. गायकवाड लिपिक फोंडशिरस शाखा येथून लिपिक श्रीपुर शाखा येथे, श्रीमती एम. यु. खुडे लिपिक अकलूज मार्केट यार्ड शाखा येथून लिपिक माळीनगर शाखा येथे, श्रीमती एम. बी. वाघ लिपिक माळीनगर शाखा येथून लिपिक अकलूज मार्केट यार्ड शाखा येथे, सौ. एस. ए. शिंदे लिपिक शिंदेवाडी शाखा येथून लिपिक धर्मपुरी शाखा येथे, एस. डी. पवार लिपिक श्रीपुर शाखा येथून लिपिक यशवंतनगर शाखा येथे, डी. आर. जाधव लिपिक यशवंतनगर शाखा येथून लिपिक तांदुळवाडी शाखा येथे, पी. एल. गायकवाड लिपिक माळीनगर शाखा येथून लिपिक निमगाव मगराचे शाखा येथे, एस. एल. मोरे शिपाई अकलूज शाखा येथून शिपाई वेळापूर शाखा येथे, श्रीमती एस. एम. कवितके शिपाई नातेपुते शाखा येथून शिपाई सदाशिव नगर शाखा येथे, पी. बी. शेगर शिपाई माळीनगर शाखा येथून शिपाई माणकी शाखा येथे, कु. आर. एस. काकडे शिपाई सदाशिवनगर शाखा येथून शिपाई नातेपुते शाखा येथे, एस. के. कुलकर्णी शिपाई श्रीपुर शाखा येथून शिपाई अकलूज शाखा येथे, के. बी. गायकवाड शिपाई फोंडशिरस शाखा येथून शिपाई माळीनगर शाखा येथे बँकेचे कामकाज सुलभतेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

सदरच्या बदल्या नियमाने केलेल्या आहेत. रणजीतदादांच्या नावाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर तालुक्यातील लोक दबाव आणत आहेत. यासाठी रणजीतदादांनी यामध्ये फेरफार न करता सर्वांना हजर होण्याच्या सूचना कराव्या, अशी सोलापूर जिल्हा बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांची इच्छा आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom