अंकोली येथील आरोग्यसेविका योगिता साळुंखे – पवार यांचा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उपक्रमात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका योगिता नागनाथ साळुंखे – पवार यांचा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उपक्रमात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उपक्रमात सन – २०२४- २५ या वर्षात उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मोहोळ तालुका पंचायत समितीच्या लोकनेते बाबुराव अण्णा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. घाडगे यांच्या हस्ते व मोहोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर, आरोग्य विस्तार अधिकारी जयमाला शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत योगिता साळुंखे – पवार यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल अंकोली गावचे माजी सरपंच संदीपकाका पवार, विद्यमान सरपंच पांडुरंग येळवे, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, माजी सरपंच सज्जन पवार, पोलीस पाटील बापू गोडसे, संग्रामसिंह पवार, माजी सरपंच गोरख पवार, अंकोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. धनंजय घाटुळे यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



