साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम….

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना, लहुजी शक्ती सेना व लहुजी साम्राज्य ग्रुप अकलूज यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वाटप…
अकलूज (बारामती झटका)


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ साठे समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त आजपर्यंत 50 हजार वह्यांचे वाटप केलेले आहे. समाजातील दरवर्षी 100 मुलींच्या नावावर पाच हजार रुपयाची बँकेची ठेव पावती केली जाते. आतापर्यंत 667 मुलींना त्यांच्या नावावर ठेव पावती ठेवून लाभ दिलेला आहे.
अकलूज ग्रामपंचायत सध्याची अकलूज नगर परिषद मधील स्वच्छता विभागातील कष्टकरी श्रमिक सर्व महिलांना भरजरी साडी वाटप दरवर्षी केले जाते. पाचशे कलमी आंब्यांची रोपे करीत असतात. आजपर्यंत 25,000 कलमी आंब्याच्या रोपांचे वाटप केलेले आहे. यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलेला आहे. ग्रामीण भागातील नवीन तरुणांना जयंती व पुण्यतिथी साजरी करताना पुतळ्याची अडचण येऊ नये यासाठी 23 पूर्णाकृती पुतळ्याच्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.


तरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना धवलनगर अकलूज, लहुजी शक्ती सेना माळशिरस तालुका व लहुजी साम्राज्य अकलूज यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



