साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा संघटना, काँग्रेस शहर कमिटी, लहुजी साम्राज्य ग्रुप आणि नवनाथ साठे मित्र मंडळ यांच्यावतीने सामाजिक उपक्रम

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप, महिला सफाई कामगारांना साडी चोळी, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप..
अकलूज (बारामती झटका)
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना, काँग्रेस शहर कमिटी, लहुजी साम्राज्य ग्रुप आणि नवनाथ साठे मित्र मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अकलूजमध्ये रोज स्वच्छता करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अकलूज नगर परिषदेमधील सर्व साफसफाई महिला कर्मचारी यांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अकलूज परिसरातील ५ हजार विद्यार्थ्यांना वही वाटप, शालेय साहित्य वाटप, तसेच जैन मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. अकलूज शहरातील सर्व महामानवाच्या पुतळ्यांची दररोज देखभाल करणाऱ्या दोन कामगारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपूर्ण पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी बोलताना दयानंद गोरे म्हणाले की, अण्णाभाऊंनी आयुष्यभर कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी आवाज उठवला. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून जनसेवा संघटना व नवनाथ भाऊ साठे यांच्याकडून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मी या कार्यक्रमात सलग तीन वर्षांपासून उपस्थित राहतो आहे. दरवर्षी जनसेवा संघटनेच्या मार्फत गोरगरीब मुलींना पाच हजार रुपयांची ठेव त्यांच्या नावे ठेवले जाते. तसेच जनसेवा संघटनेच्या मार्फत नवनवीन उपक्रम राबवले जातात. असेच उपक्रम सर्व मंडळाने राबवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डीजेला फाटा देऊन गोरगरिबांना मदत, रक्तदान शिबिर, सामाजिक काम ही संघटना खूप करते. या संघटनेच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.



यावेळी डॉ. अनिकेत इनामदार, डॉ. मानसी इनामदार, अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे, डॉ. प्रियंका शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश पालकर, संतोष भैय्या राऊत, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रणजित देशमुख, काँग्रेसचे सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे, मयूर माने, शरद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ज्योतीताई कुंभार, सचिन गायकवाड, बबनराव शेंडगे, उमेश जाधव, सतीश साठे, महादेव साठे, उमेश साठे, रफिक सय्यद व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.