क्रीडाताज्या बातम्याराजकारण

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या तिसऱ्या पिढीतील 24 कॅरेट सोने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील राजकीय व सामाजिक वारसा सक्षमपणे चालवत आहेत…

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा राजकीय व सामाजिक वारसा सक्षमपणे पुढे चालू आहे. आजोबा व वडिलांच्या विचारांचा आदर्श घेऊन राजकीय व सामाजिक वाटचाल सुरू आहे. आजोबांच्या, वडिलांच्या नावाचा वापर करून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची वाटचाल सुरू नसल्याने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या तिसऱ्या पिढीतील 24 कॅरेट सोने म्हणजेच डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी निवड नुकतीच जाहीर झाली असून या परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणुक पुणे येथे पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील 33 जिल्हा संघटनांनी सहभाग घेतला होता. या निवडणुकीत कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आ. रोहितदादा पवार यांची निवड करण्यात आली असून बिनविरोध कार्याध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मुहूर्तमेढ रोवलेली होती. त्यानंतर या परिषदेचे दिर्घकाल नेतृत्व शरदचंद्रजी पवार यांनी केले होते. शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यकाळात कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली होती.

ग्रामीण भागात कुस्तीच्या खेळाला चालना देण्याचे काम व मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून होत असून काही वर्षापुर्वी महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या माध्यमातून लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन करण्यात आले होते. तसेच लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपमहाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येतो. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध योग्य निवड झाली असल्याची भावना कुस्ती क्षेत्रामध्ये बोलल्या जात आहेत.

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेली आहे. जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना पुन्हा गतवैभव प्राप्त करणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतापगडाचा राजकीय पदाचा त्याग करण्यामध्ये कोणीही हात धरू शकणार नाही. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस कमिटीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा स्वाभिमानाने दिला असल्याची जिल्ह्याच्या राजकीय इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. प्रतापगडाने आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सत्ता असो अथवा नसो माणूस हा केंद्रबिंदू म्हणून जनसेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा केलेली आहे.

प्रतापगडाचे राजकीय ग्रहण संपत आलेले आहे. उद्याचा सूर्य डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने निश्चितपणे राजकारणात तळपत राहील, असा ठाम विश्वास जनसेवेच्या कार्यकर्त्यांना असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. जनसेवेची स्वाभिमानी धवलदादांच्या पाठीशी ठाम उभी राहिलेली आहे. सिंहाचा छावा सोलून तलाखून निघालेला आहे. ज्याप्रमाणे 24 कॅरेट सोन्याला भट्टीमध्ये तापल्यानंतर चकाकी येते त्याचप्रमाणे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीला निश्चितपणे चकाकी येईल, असा आशावाद निष्ठावान कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom