ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सकल धनगर समाजाच्यावतीने माळशिरस येथील अहिल्यादेवी चौकात रास्ता रोको करण्यात आला…

धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. रेश्माताई टेळे यांच्या व उपस्थितांच्या हस्ते नायब तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन

माळशिरस (बारामती झटका)

सकल धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी आज माळशिरस येथील अहिल्यादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. रेश्माताई टेळे यांच्या व उपस्थितांच्या हस्ते माळशिरस तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अमोल कदम यांना देण्यात आले.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, सकल धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने माळशिरस येथे एकत्र येऊन आंदोलन करून हे निवेदन देत आहोत. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा समावेश घटनाकारांनी घटनेमध्ये शेड्युल २ मध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ नंबरवर केलेला आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने त्याबाबत अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी शिफारस अद्यापपर्यंत केलेली नाही. म्हणून धनगर समाजाला अद्यापपर्यंत एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळत नाही. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज वेळोवेळी आंदोलने करून एस.टी. प्रवर्गाचे आरक्षणाच्या सवलती लागू करण्याची मागणी करत आहे. आजही तीच मागणी करण्यासाठी आम्ही आंदोलन करून हे निवेदन देत आहोत. ते निवेदन शासनाकडे पाठवण्याची ही विनंती करण्यात आली आहे.

सध्या धनगर समाजाला महाराष्ट्रात एन.टी. प्रवर्गाचे आरक्षण दिले जात आहे‌ यापूर्वी एन.टी. प्रवर्गाला ११.५ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामध्ये अ साठी २ टक्के, ब साठी २ टक्के, क (धनगर) साठी ३.५ टक्के आणि ड (वंजारी) साठी २ टक्के असे आरक्षण दिले आहे. परंतु, शासनाने दि. २९/०५/२०१७ रोजी एक जी.आर. काढून त्यामध्ये बदल केला आहे. त्यामुळे धनगर समाजाला दिलेले आरक्षण मिळत नाही. त्यामुळे घटनेतील आरक्षण लागू होत नाही व दिलेले आरक्षणही मिळत नाही‌ त्यामुळे धनगर समाज फार मोठ्या प्रमाणावर नाराज आहे.

वास्तविक धनगर समाज आरक्षणाचे निकषात बसत आहे. सध्या धनगर समाजाला राज्यामध्ये एन.टी, प्रवर्गाचे, देशांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे व घटनेत एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण आहे. परंतु, यापैकी एकाही आरक्षणाचा योग्य लाभ मिळत नाही. त्यासाठी धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे व दि. २९/०५/२०१७ रोजीचा महाराष्ट्र शासनाने काढलेला जी.आर. रद्द करून धनगर समाजाला एन.टी. प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत लागू ठेवावे. यासाठी आम्ही सकल धनगर समाज हजारोंच्या संख्येने माळशिरस येथे येऊन हे निवेदन देत आहोत, त्याप्रमाणे शासनाने अंमलबजावणी करावी. अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी विधान परिषदेचे माजी सदस्य ॲड. रामहरी रुपनवर, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, डॉक्टर मारुती पाटील, सोमनाथ वाघमोडे, गणपतराव वाघमोडे, मच्छिंद्र ठवरे, संजय पाटील, भानुदास पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सूळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर, जयवंत सूळ, सुरेश टेळे, बाळासाहेब सरतापे, बाळासाहेब कर्णवर, पांडुरंग वाघमोडे, राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब माने पाटील, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर, तुकाराम देशमुख, मारुती देशमुख, हनुमंत सूळ, मधुकर पाटील, शशिकांत तरंगे, ॲड. आकाश पाटील, विष्णू गोरड, वीरेंद्र वाघमारे, भाऊ कोळेकर, हनुमंत सरगर, महादेव देशमुख, सुरेश वाघमोडे, संदीप पाटील, सोपान नारनवर, मामा पांढरे, माऊली पाटील, विष्णू नारनवर, युवराज झंजे, केपी काळे, रमेश पाटील, बाजीराव माने आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने धनगर बांधवांसह अनेक समाजबांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button