सकारात्मक विचार हाच आनंदी जगण्याचा खरा मूलमंत्र आहे. – जयसिंह मोहिते-पाटील.

वयाच्या ७५ व्या वर्षी बाळादादांनी आपल्या उत्साही व आनंदी जीवनाचे गुपीत राज सांगितले.
अकलूज (बारामती झटका)
जीवनात सकारात्मक विचार केला तर माणसांना नवीन जीवन जगण्याची उर्जा मिळते, असे उद्गगार जयसिंह मोहिते-पाटील यांनी काल सुमित्रा पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, माणूस सकारात्मक विचारांमुळे आयुष्यभर माणूस आनंदी राहतो हाच सुखी व आनंदी जीवन जगण्याचा खरा मूलमंत्र आहे. त्यामुळे दररोज नवीन वेगळे कार्य करण्याची शक्ती व प्रेरणा मिळते. यातूनच सर्वांना सुख व समाधान आहे. प्रत्येकांनी आपल्यातील नकारात्मक विचार न करता सदैव सकारात्मक चांगले विचार आमलात आणले तर जीवन सुखकारक होऊन जाईल. माझ्या जीवनाच्या प्रवासात मी सदैव चांगलेच कार्य करत राहिल्यामुळे आज मी वयाच्या ७५ व्या वर्षीही सतत उत्साही व आनंदी राहिलो आहे. त्यामुळे लोकांसाठी नवीन काहीतरी करण्याची मला प्रेरणा व शक्ती मिळत आहे.
यावेळी सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, दिपक खराडे-पाटील, सुभाष दळवी, अशोक जावळे, विजय शिंदे, नारायण फुले, विलास भरते, विशाल फुले, अभिजीत रणवरे आदी उपस्थित होते.
दूरदृष्टी नेते बाळदादा यांच्यामुळे गोरगरीबांपासून सर्वसामान्य लोकांचे कल्याण व प्रगती झाली आहे. सर्वांची स्वप्न सत्यात उतरली आहेत. त्याच्यामुळे आज सर्वसामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, खासदार, सहकारी संस्थेचे संचालक झालेले आहेत. – महादेव अंधारे चेअरमन, सुमित्रा पतसंस्था, अकलूज
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.