ताज्या बातम्याराजकारणशैक्षणिक

सालगुडे पाटील यांच्या राजकीय घराण्यात दामिनी हिने शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व व्हाईस चेअरमन स्व. ज्ञानेश्वर सालगुडे पाटील यांची नात बांधकाम विभागात जुनियर आर्किटेक्ट

सदाशिवनगर (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे माजी चेअरमन व व्हाईस चेअरमन स्वर्गीय ज्ञानेश्वर संताराम सालगुडे पाटील यांची नात दामिनी भानुदास सालगुडे पाटील हिची महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथे ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून निवड झालेली आहे. सालगुडे पाटील यांच्या राजकीय घराण्यात दामिनी हिने शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवलेला आहे‌. त्यामुळे पुरंदावडे व सदाशिवनगर पंचक्रोशीत समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

स्वर्गीय ज्ञानेश्वर सालगुडे पाटील उर्फ अण्णा यांनी माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राजकारण करून सालगुडे पाटील हे राजकीय घराणे होते. सालगुडे पाटील यांच्या घराण्यामध्ये श्री. भानुदास सालगुडे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष पद भूषवलेले आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. नीलिमा भानुदास सालगुडे पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य व सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषविलेले आहे. श्री. पांडुरंग सालगुडे पाटील यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविलेले आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. कविता पांडुरंग सालगुडे पाटील यांनी पुरंदावडे गावचे सरपंच पद भूषविलेले आहे. श्री. नारायण सालगुडे पाटील यांनी सदाशिवनगर गावचे उपसरपंच पद भूषवून शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक असून दामिनी दूध संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सौ. देवयानी नारायण सालगुडे पाटील यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविलेले आहे. अशा सालगुडे पाटील यांच्या राजकीय घराण्यात दामिनी हिने शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवलेला आहे.

दामिनी हिचे प्राथमिक व दहावीपर्यंत शिक्षण शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल धवलनगर, अकलूज येथे झालेले आहे. अकरावी बारावीचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान एमआयडीसी बारामती येथे झालेले आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर सांगली येथे केलेले आहे‌. मास्टर इन टाऊन प्लॅनिंग पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजीनगर पुणे येथे सीओईपी कॉलेजमध्ये केलेले आहे. सध्या दामिनी भानुदास सालगुडे पाटील हिची महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथे ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून निवड झालेली आहे. यामुळे दामिनीवर सदाशिवनगर व पंचक्रोशीतून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Back to top button
12:03