समाज माध्यमांसमोर पवार साहेबांची तुतारी हाती घेऊ म्हणणारे भेटीसाठी मागच्या दरवाजाने का ? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण….

ग्रामीण भागात म्हण आहे, ‘ताकाला जायचं आणि मोगा लपवायचा’, असाच प्रकार झाल्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू…
मुंबई (बारामती झटका)
श्रीकृष्णाच्या बासरीने गवळणींना वेड लावलेले होते, तसाच प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाकडे गेलेले असल्याने नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तुतारी चिन्ह घेतलेले आहे. अनेक असंतुष्ट लोक तुतारीकडे आकर्षित झालेले आहेत. अनेक राजकीय नेते उघडउघड समाज माध्यमांसमोर पवार साहेबांची तुतारी हाती घेऊ म्हणणारे शरदचंद्र पवार यांना भेटण्यासाठी पुढच्या दरवाजाने न जाता मागच्या दरवाज्याने जातात, या भेटीच्या उलटसुलट चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलेले आहे. ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे, ताकाला जायचं आणि मोगा लपवायचा, असाच प्रकार झाल्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे हात चिन्ह सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तुतारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मशाल, अशी वेगवेगळी चिन्हे प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीत येत आहेत. कृष्णाच्या बासरीसारखे पवार साहेबांच्या तुतारीने महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांना वेड लावलेले आहे. पवार साहेबांची सहमती न घेता काही तुतारी हातात घेत आहेत, कोणी घेणार आहे असे म्हणत आहे. तुतारीची आवड निर्माण झालेली आहे मात्र, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर आग ओखणारे सुद्धा पवार साहेबांची तुतारी तुतारी असे म्हणू लागलेले आहेत. मात्र, भेटीसाठी जाताना उघड उघड न जाता गुपचूप पाठीमागील दरवाज्याने चर्चेला गेली असल्याची चर्चा समाज माध्यम व महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेली आहे. लवकरच लोकसभेचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तुतारी कोणाच्या नशिबी आहे, याचा फैसला होणार आहे. तोपर्यंत तुतारी हाती घेण्यासाठी अनेकजण नादावलेले आहेत. तर काहींचा नाद पुराच होणार नाही, अशीही चर्चा शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावान यांच्यामधून सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.