समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनसेवक जलनायक ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सन्मान केला….

भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या विरोधकांनो “उघडा डोळे, बघा नीट”
राळेगणसिद्धी (बारामती झटका)
माहिती अधिकाराचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुष्काळी माणदेशाचा मानबिंदू महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा यथोचित सन्मान करून भावी कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोप करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करून भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधकांना उघडा डोळे आणि बघा नीट, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नामदार जयकुमार गोरे यांचा सन्मान केलेला आहे. अण्णा हजारे कोणत्याही राजकीय नेत्यांचा सन्मान करीत नाहीत. वीस वर्ष जनतेची अविरतपणे सेवा करून माण देशामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनता सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, असे समाजसेवक व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी येऊन दुष्काळी पट्ट्यामध्ये निसर्गाचा हिरवा शालू पसरला पाहिजे यासाठी अहोरात्र पाण्यासाठी झटणारे जलनायक म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे जया भाऊ उर्फ जयकुमार गोरे यांचा यथोचित सन्मान करून कानमंत्र दिलेला आहे.
समाजसेवक अण्णा हजारे औपचारिक चर्चा करताना एक बोट वर केलेले आहे. त्यांच्या बोटामध्ये एक संदेश जातोय विरोधक “अरे, कितीही येऊ दे एकटा बास”, असे त्यांना सुचित करावयाचे आहे का ?, असाही समाज माध्यमांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. अण्णा हजारे यांनी जया भाऊ यांच्या खांद्यावर हात ठेवून तु चाल गड्या पुढे तुला भीती कशाची, असाही संदेश देऊन पाठीवरती शाब्बासकीची थाप दिलेली आहे.

मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी,आकाशातील रंगीबेरंगी पतंगांप्रमाणे तुमचे हृदय आनंदाने उंच भरारी घेवो. जसजसा सूर्य उत्तर दिशेचा प्रवास सुरू करतो तसतसे तुमचे जीवन सकारात्मकता,उबदारपणा आणि समृद्धीने भरले जावो. मकर संक्रांत २०२५ च्या शुभेच्छा! तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंददायी आणि उदंड मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💥
तिळगुळ घ्या..गोड गोड बोला..
श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील
संपादक बारामती झटका
वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल
मु.पो.मळोली ता माळशिरस जि. सोलापूर 9850104914
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.