सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट व रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर…

ना. संजय शिरसाट व ना. भरतशेठ गोगावले यांचे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम निवासस्थानी आगमन..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट यांचा सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी माळशिरस तालुका दौरा जाहीर झालेला असून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी दुपारी 12 वा. सदिच्छा भेट असा शासकीय दौरा जाहीर झालेला आहे.
https://www.instagram.com/baramatizhatkanews_?utm_source=qr&igsh=azhnYjJ5emR2cjFm
ना. भरतशेठ गोगावले सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह सर्किट हाऊस, जि. पुणे येथून माळशिरस तालुक्याकडे प्रयाण होणार आहे. दुपारी 12 वाजता माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम निवासस्थानी मांडवे येथे आगमन व सदिच्छापर भेट आहे. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता हॉटेल न्यू आर्या गार्डन नातेपुते येथे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून 2.30 वाजता चैतन्य मंगल कार्यालय नातेपुते येथे होलार समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. 4.30 वाजता नातेपुते येथून सुरुची शासकीय निवासस्थान मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. असा रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा नियोजित दौरा ठरलेला आहे.
ना. संजय शिरसाट सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता छत्रपती संभाजीनगर निवासस्थान येथून खाजगी वाहनाने माळशिरस तालुक्याकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर दौंड बारामती नातेपुते मार्गे प्रयाण करून माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी दुपारी 12 वा. आगमन व सदिच्छा भेट देणार आहेत. 12:45 वाजता चैतन्य मंगल कार्यालय दहीगाव रोड नातेपुते येथे होलार समाज संकल्प मेळावा 2025 या कार्यक्रमास उपस्थित राहून 2.30 मिनिटांनी मुंबई सेंटर कडे प्रयाण करणार आहेत. असा सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाट यांचा दौरा जाहीर झालेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



