ताज्या बातम्या

समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील प्रेमळ आणि विनम्र स्वभावामुळे आदर्शवत ठरले होते – उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस.

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नातेपुते नगरीचे जेष्ठ नेते व माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांचे 19 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले होते.

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी राजेंद्रभाऊ यांचे चिरंजीव अतुलबापू पाटील यांना शोक संदेशाचे पत्र पाठवून पाटील परिवारातील सदस्यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी अतुल बापू पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपले वडील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. वडिलांचे आयुष्यातून निघून जाणे हे माणसाला एकाकी पाडणारे असते. एक मोठा आधारस्तंभ आयुष्यातून निघून जाण्याची पोकळी कधीच भरून निघत नसते. शब्दांनी संवेदना तेवढ्या प्रवाहित होत असतात. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

राजेंद्रभाऊ हे महादेवाचे निस्सीम भक्त. आयुष्यभर त्यांनी नातेपुते आणि परिसरातील जनतेचा भक्कम आधार म्हणून सेवा केली. त्यांचा प्रेमळ आणि विनम्र स्वभाव यामुळे ते आदर्शवत ठरले होते. त्यांच्या कायम जाण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दल आदराची भावना अधिकच तीव्र झाली. त्यांचे अचानक निघून जाणे हे वेदनादायी असले तरी आता त्यातून सावरणे आणि त्यांचे कार्य पुढे अखंडितपणे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्हा सर्व कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

https://www.youtube.com/live/A3KylIrjnQA?si=6VJW5JSoxLryaiS2

Related Articles

3 Comments

  1. Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further exploration, I recommend visiting: READ MORE. Keen to hear everyone’s opinions!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button