ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

समाज कल्याणच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार; सभापती संस्कृतीताई सातपुते यांनी सुरू केले कामकाज

सोलापूर (बारामती झटका)

जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संस्कृतीताई सातपुते यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेत सातपुते यांनी आपले कामकाज सुरू केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सभापती यांची भेट घेऊन त्यांचा त्यांनी सत्कार केला.

यानंतर पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या. समाज कल्याण विभाग हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा चांगला मार्ग आहे. मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असून प्रत्येक योजना वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला कायम पुढाकार राहील.

समाजकल्याण विभागात असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता जाणून घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे तातडीने समाज कल्याणची रिक्त पदे भरण्यासाठी आपली मागणी राहील असेही त्यांनी सांगितले.

मुलींचे वसतिगृह तसेच दिव्यांग शाळा त्यामध्ये कितपत सोयी सुविधा दिल्या जातात, याकडे आपली बारीक नजर राहणार आहे. माजी आमदार तथा माझे पती राम सातपुते यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊनच आपली राजकीय वाटचाल सुरू असल्याचे सांगत मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button