सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, विकास कामाचा प्रवाह पुढे चालू ठेवण्यासाठी मोठ्या मताधिक्याने मला विजयी करा – रणजीत शिंदे
माढा (बारामती झटका)
सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आमदार बबनदादांनी या ४२ गावात कोट्यावधी रुपयाचा विकास निधी देऊन रस्ते, वीज, मूलभूत सुविधांची उभारणी केली. हीच परंपरा भविष्यात कायम चालू ठेवण्यासाठी येत्या २० तारखेला तुंगत नागरिकांनी सफरचंद या चिन्हापुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला विजयी करा, असे आव्हान माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांनी केले आहे. ते तुंगत (ता. पंढरपूर) येथील जाहीर प्रचार सभेत बोलत होते. आज यापूर्वी नेमतवाडी पिराची कुरोली (चिंचणी टप्पा), चिंचणी, वाडीकुरोली या गावीही प्रचार सभांचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार बबनदादा शिंदे, प्रणव परिचारक, वामनराव माने, सुभाषराव माने, संजय पाटील, सरपंच आगतराव रणदिवे, समाधान पाटील, मारुती वाघ यांचेसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
रणजीत शिंदे पुढे म्हणाले की, समोरची मंडळी विकास कामांविषयी न बोलता इतर बाबीवर ‘खोटं पण रेटून बोलतात’ परंतु, जनतेने त्यांना चांगलेच ओळखलेले आहे. उसाचा वजन काटा मारणे, उसाच्या दराचा बडीजावा करणे याबाबत दिशाभूल केली जात आहे. सर्वांना माहित आहे की, करकंबचा विठ्ठलराव शिंदे युनिट दोन हा आम्ही डीसीसी बँकेकडून लिलावात विकत घेतला आहे. व यामध्ये ४२ गावातील ऊस गळीतास प्राधान्य देऊन दहा दिवसाला ऊस बिल दिले जात आहे. आम्ही मागील दोन ते तीन वर्षापासून सांगत आहोत की, शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे वजन कोणत्याही काट्यावर करून आणावे आमची कोणतीही हरकत नाही, आम्ही त्याचा स्वीकार करू, पण खोट्या प्रचाराला बळी पडू नका. दोन वर्षांपूर्वी कोणाच्या कारखान्यावर शेतकऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची उसाच्या वजनावरून भांडणे झाली व वजन काटा बंद पडला हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. विठ्ठल कारखान्याने यावर्षी 2825 रुपये दर दिला आहे. परंतु, सांगताना मात्र हा उमेदवार अनुदानासह दिलेला 3000 रुपये दर दिला असं सर्वत्र सांगतो, परंतु आम्ही 2900 दर निला सा अनुदानासहित 3015 रुपये दर दिला आहे पण आम्ही कधीही भपका करत नाही.
रणजीत शिंदे म्हणाले की मी सरपंच, पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा दूध संघाचा चेअरमन म्हणून काम करत असताना मोठा अनुभव घेतलेला आहे. आमदार बबनदादा शिंदे यांनी चालू ठेवलेले सामाजिक उपक्रम म्हणजेच सामुदायिक विवाह सोहळा, काशीयात्रा, तुळजापूर-अजमेर-बौद्धगया यात्रा, नेत्र शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिर व इतर अनेक विकासाचा प्रवाह चालूच राहील. यावर विश्वास ठेवा, म्हणून मतदारांनी भूलथापांना बळी न पडता २० तारखेला सफरचंद या चिन्हापुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावे व सेवेची संधी द्यावी, असे आव्हान रणजीत शिंदे यांनी यावेळी केले.
ही निवडणूक जिंकलेली आहे, फक्त तुम्ही मतदानाविषयी गाफील राहू नका – आमदार बबनदादा शिंदे
याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, मागील पंधरा वर्षात मी केलेल्या विकासकामांची पोहोच म्हणून तुम्ही मतदारांनी रणजीत शिंदेला भरघोस मतदान करून विजयी करावे. समोरचा विरोधी उमेदवार खोट्या अफवा पसरवण्यात तरबेज आहे, तो म्हणतो की जिल्ह्यातील साखर कारखानदारांची मीटिंग होऊन विठ्ठल बंद पाडण्याचे षडयंत्र झाले जात आहे, पण हे सर्व खोटे आहे, अशी कुठलीही जिल्ह्यात मीटिंग झाली नाही. कोणत्याही साखर कारखानदाराला विचारा तुम्हाला सत्य कळेल.
वस्तुस्थिती अशी आहे की, गुरसाळ्याच्या विठ्ठल कारखान्यावर 700 कोटीचे पहिलेच कर्ज आहे. पुन्हा याला 267 कोटी कर्ज मिळाले आहे, हे कर्ज मिळण्यासाठी यांनी किती नाटकं केली हे पंढरपूर सहित सगळ्या जनतेला माहित आहे. तरी पण कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे पैसे याने अद्याप दिलेले नाहीत व मिळालेल्या पैशातून निवडणुकीसाठी वारे माप उधळण चालू आहे, हे आपण सर्वजण पाहता आहात. त्याच्या वाईट कर्माचे फळ त्याला मिळणारच आहे म्हणून त्याच्या भूलथापांना बळी न पडता, त्याची कुटील नीती जाणून घ्या. हा गडी समोरच्यांची फसवणूक करून दिशाभूल करण्यात तरबेज आहे, पण मतदान करताना फसू नका, मतपत्रिकेत दहा नंबरला रणजीत शिंदे यांची खूण सफरचंद आहे, घरोघरी आपण प्रचार करून सफरचंद चिन्हा पुढील बटन दाबून मतदान करणे विषयी सर्वांना समजावून सांगा, ही निवडणूक आता आपण 100% जिंकलेलीच आहे. पण कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असेही आमदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
बबनदादांनी संस्कारची परंपरा जपली म्हणून ते सर्वांना आपले वाटतात – प्रणव परिचारक
स्वर्गीय सुधाकर परिचारक, औदुंबर आण्णा पाटील, यशवंत भाऊ पाटील, वसंतराव काळे, राजू बापू पाटील यांच्या संस्कारांचा वारसा आदरणीय बबनदादांनी मागील पंधरा वर्षे या 42 गावात जपला आहे, म्हणून त्यांचे वर जनतेने अफाट प्रेम केले आहे व विश्वास ठेवला आहे. म्हणून आम्हा युवा पिढी पुढे या वडीलधाऱ्यांचा एक आदर्श निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण या निवडणुकीत रणजीत शिंदे यांना मोठे मताधिक्य द्यावे आणि वडीलधाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे शेतकऱ्यांना वैभवाचे आलेले दिवस हे पुढेही चालू ठेवण्याची परंपरा कायम ठेवावी म्हणून काळजीपूर्वक मतदान करून रणजीत शिंदे यांना विजयी करा. सरकार कोणतेही येऊ द्या दबदबा शिंदेंचाच असणार याची सर्वांना खात्री आहे.
याप्रसंगी तानाजी रणदिवे, आगतराव रणदिवे, उपसरपंच प्रकाश रणदिवे, सागर रणदिवे, दिलीप काका रणदिवे, महादेव देठे, प्राध्यापक मारुती जाधव, समाधान पाटील, वामनराव माने आदी मान्यवरांनी आपले समयोचित विचार व्यक्त करून रणजीत शिंदे यांना विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्टा करायची असे प्रतिपादन केले. या प्रचंड मोठ्या प्रचार सभेसाठी तुंगत परिसरातील अनेक गावातील नागरिक, महिला, बंधू, भगिनी, गावोगावचे सरपंच, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.