संभाजी बाबा दरा येथे म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांच्या हस्ते आरती संपन्न
भांब (बारामती झटका)
दि. २२ जानेवारी रोजी आयोध्येत श्री राम मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मंदिरात स्वच्छता, महाआरती, अन्नदान करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भांब ता. माळशिरस येथील संभाजी बाबा दरा हे शिखर शिंगणापूरच्या डोंगर कपारीमध्ये वसले आहे. अतिशय दुर्गम परिसर, डोंगर कपारीने वेढलेले भांब गाव आहे. भांब येथे संभाजी बाबा दरा कुस्ती कमिटीचे मार्गदर्शक म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी ह. भ. प. गायकवाड महाराज, मधुकर पांढरे सर, किसन काळे मुंबई पोलीस, पंढरीनाथ काळे उद्योजक मुंबई, उद्योजक तात्या पांढरे, रघुनाथ पांढरे, बापू मदने, बाबा मदने, धोंडीबा शेंडगे, किसन शेंडगे, बाबा मदने, बापू काळे, दादा काळे, सदा मदने आदींसह समस्त भांब गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भीमराव काळे यांनी मुंबई येथे नोकरी करीत असताना परिवारावर ज्याप्रमाणे लक्ष दिले, त्याचप्रमाणे आपण ज्या परिसरामध्ये वाढलो, खेळलो त्या परिसरालासुद्धा ते विसरले नाहीत. ग्रामदैवत संभाजी बाबा दरा परिसर विकसित करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच गावातील सहकाऱ्यांच्या सहकार्याने 2017 पासून पुन्हा संभाजी बाबा येथील कुस्ती मैदान भीमराव काळे यांच्या प्रयत्नाने सुरू झाले आहे. भांब परिसरामध्ये सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. आपल्या स्वकार्यातून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण उर्फ म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.