ताज्या बातम्यासामाजिक

संभाजी बाबा मंदिराच्या शिखर बांधकामाची पाडव्यादिवशी बैठक संपन्न होणार….

पंचक्रोशीचे ग्रामदैवत संभाजी बाबा भाविकभक्तांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे – उपमुख्य अभियंता भीमराव काळे.

भांब (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर शिंगणापूरच्या घाटमाथ्याच्या पायथ्याला स्वयंभू असणारे संभाजी बाबा मंदिर येथील शंभू महादेव मंदिराच्या शिखर बांधकामाची बैठक मंगळवार दि. ९/४/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संभाजी बाबा मंदिरामध्ये संपन्न होणार आहे.

स्वयंभू व पावन असणारे संभाजी बाबा मंदिर उपेक्षित राहिलेले होते. भांब गावचे व पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असणारे मंदिराचा जिर्णोद्धार व मंदिर विकास सुरू आहे. सदरच्या ठिकाणचा सभामंडप लोकवर्गणीतून तयार केलेला आहे. सदरच्या ठिकाणी पेव्हींग ब्लॉक व मंदिराकडे भांबपासून जाणारा अनेक दिवसापासून प्रलंबित असणारा रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे. संभाजी बाबा मंदिरासाठी म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती मंदिराच्या विकासकामांसाठी धडपडत आहेत.

सदरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रेच्या वेळी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मल्ल व कुस्ती शौकीन येत असतात. संभाजी बाबा यांचे भाविकभक्त अनेक ठिकाणाहून येत असतात. श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. मंदिराच्या ठिकाणी शिखर व कळस असावा, अशी संकल्पना भाविकभक्तांमधून येत आहे. यासाठी म्हाडाचे उपमुख्य अभियंता श्री. भीमराव काळे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाडव्यानिमित्त शिखर व कळस बांधण्यासाठी बैठकीचे आयोजन केलेले आहे. तरी भांब ग्रामस्थ व भांब पंचक्रोशीतील संभाजी बाबा यांच्या भाविकभक्तांनी उपस्थित रहावे असे, संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती भांब यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button