संपादक गौतम भंडारे यांना धमकावल्याबद्दल ॲड. नितीन खराडे यांच्यावर ५०७ प्रमाणे एनसी दाखल

धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीकात्मक बातमी का लिहिता, यासाठी फोनवरून धमकवल्याबद्दल अकलूज पोलीस स्टेशन येथे ॲड. नितीन खराडे यांच्यावर एनसी दाखल
अकलूज (बारामती झटका)
साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी ॲड. नितीन खराडे यांच्या विरोधात अकलूज पोलीस स्टेशन येथे दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय दंड संहिता 1860 कलम 507 नुसार एनसी दाखल केली आहे.
घडलेली हकीकत अशी कि, दि. 08/02/2024 रोजी रात्री 10 वाजून 13 मिनिटे या वेळेला ॲड. नितीन खराडे यांनी फोनवरून तुला पत्रकारिता व्यवस्थित करायची आहे की नाही ? तुला बघून घेतो, असे म्हणून तुझा लोकशाहीचा कसला चौथा स्तंभ असे म्हणून जोरजोराने बोलून दमदाटी केली व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात बातमी लावली तर तुझे काही खरे नाही, अशी दमदाटी केली. यावरून संपादक गौतम भंडारे यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची हकिकत सांगून एनसी दाखल केली आहे.

यावेळी बोलताना संपादक गौतम भंडारे म्हणाले की, मी बंडखोर वेब पोर्टलवर माढा लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीबद्दल राजकीय विश्लेषण प्रसिद्ध केल्यानंतर ॲड. नितीन खराडे यांनी मला फोन करून तुला आपली केस मिटवायची आहे की वाढवायची आहे ? साहेब तुझी बाजू घेत असले तरी ते गेल्यानंतर केस लढवून तुला जेलमध्ये नाही पाठवले तर नाव सांगणार नाही ! खासदारावर तुझे प्रेम खूपच उतू चाललंय. पण यापुढे धैर्यशीलभैय्यांच्या विरोधात बातमी लावली तर तुझं काही खरं नाही, अशी मला दमदाटी केली. या धमकीमुळे अकलूज पोलीस स्टेशन येथे भादंवि ५०७ प्रमाणे एनसी दाखल झाली असून अकलूज पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल 978 श्री. बकाल पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी काम करीत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.