समूहनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी नं. १ प्रथम

वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा समितीने आयोजित केलेल्या समूहनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शेरी नं. १ शाळेने मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी समूहनृत्य स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात संपन्न होतात. यंदा या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. मोठ्या गटात शेरी नं. १ शाळेने सादर केलेल्या ‘जन्म बाईचा’ या गीताने रसिकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. शाळेस पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री. धीरज गुरव व श्री. विनोद शिंदे यांनी केले. या गीताच्या तयारीसाठी शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. प्रेमनाथ रामदासी, विज्ञान शिक्षक पांडुरंग वाघ, उपशिक्षिका रेश्मा खान व उपशिक्षक प्रदीप कोरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.