संघर्षयात्री दादासाहेब हुलगे यांच्या युवराजाचे नामकरण मोठ्या थाटामाटात संपन्न झाले….

माळशिरस (बारामती झटका)
गोरडवाडी येथे संघर्षयात्री दादासाहेब हुलगे यांच्या युवराजाचे नामकरण १९ फेब्रुवारी शिवजयंती या ऐतिहासिक दिवसाचा मुहर्त साधून सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. नामकरण सोहळ्यासाठी महिलांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती. अलिकडाच्या काळात ग्रामीण संस्कृती लोप पावत चालली असताना मुलाची आजी शेषाबाई हुलगे आणि गोपाबाई हुलगे यांनी जात्यावरील गाणी, बाळासाठी अंगाई गीत म्हणून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळाची आई सौ. सुप्रिया दादासाहेब हुलगे यांची उपस्थित महिलांनी हळदी-कुंकु लावून खणानारळांनी ओटी भरली आणि त्यानंतर नामकरण सोहळ्याला सुरवात झाली.


आत्या कुसुम गोरड, संगिता कोकरे यांनी कानात क्रुर्र करून यशराज नाव म्हटले आणि त्यानंतर सुमधुर आवाजात पाळणा आणि अंगाई गीत स्नेहा शिंदे मॅडम यांनी गायले. त्यानंतर स्नेहभोजनाला सुरवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे निमंत्रक आजोबा साधु हुलगे, दादासाहेब हुलगे, रणजित हुलगे हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत हुलगे, भगवान कोकरे, शशिकांत कोकरे, अजिनाथ कोकरे, शिवाजी हुलगे, नवनाथ हुलगे, दाजी हुलगे, जगन्नाथ हुलगे, पत्रकार संजय हुलगे, अजिनाथ हुलगे यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाला मोठया प्रमाणात महिलांसह,नातेवाईक आणि मित्र परिवार यांची लक्षणीय उपस्थिती होती.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.