ताज्या बातम्याराजकारण

सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीकडे माळशिरसकरांचे लक्ष लागले..


काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, या डायलॉगने सुप्रसिद्ध असणारे आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीसाठी लंम्पीचा प्रादुर्भाव अदृश्य करतील का ?

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन मंगळवार दि. 17/10/2023 रोजी सकाळी 10 वाजता रेडामाई मंदिर, शेटफळे रोड, कोळे, ता. सांगोला येथे करण्यात आले आहे. सदरच्या बैलगाडी शर्यतीसाठी प्रमुख पाहुणे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदरच्या मैदानाकडे माळशिरसकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी गुरांचे बाजार, बैलगाडी शर्यती यावर निर्बंध लावले आहेत.

महाराष्ट्रासह देशात व परदेशातही काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, या डायलॉगने सुप्रसिद्ध असणारे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतीसाठी लंम्पीचा प्रादुर्भाव अदृश्य करून बैलगाडी शर्यत सगळं कसं ओके करतील का ?, असा सवाल माळशिरसकरांसह बैलगाडी चालक, मालक व शौकीन यांना पडलेला आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकाराम भाऊ देशमुख व माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक व उद्योजक सचिन आप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले होते. सदरच्या बैलगाडी शर्यतीसाठी शासनाच्या सर्व परवानगी घेतलेल्या होत्या. मात्र शर्यतीच्या आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता लंम्पी प्रादुर्भावामुळे सदरचे मैदान रद्द झाले होते. मैदानाची जय्यत तयारी होऊन लांबच्या बैलगाड्या मुक्कामी आलेल्या होत्या. अचानक बैलगाडी शर्यत रद्द झाल्याने आयोजक, बैलगाडी चालक-मालक, शौकीन यांच्या आनंदावर विरजण पडलेले होते. शेवटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या शासनाच्या आदेशाचे पालन करून माळशिरसकरांनी मैदान रद्द केलेले होते. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले आहे. या बैलगाडी शर्यतीकडे माळशिरसकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button