माळशिरसमध्ये महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याच्या निवड चाचणी स्पर्धेची जय्यत तयारी सुरू
माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व मांडकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांच्या सहकार्याने लगबग सुरू
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्राची ६५ वी राज्यस्तरीय अजिंक्य पद अधिवेशन महाराष्ट्र केसरी किताबसाठी अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेची जय्यत तयारी पुणे-पंढरपूर रोड लगत सर्टिफाइड ग्राउंड माळशिरस येथे माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतम आबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व मांडकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांच्या सहकार्याने अनेक कार्यकर्त्यांची स्पर्धेसाठी क्रीडांगण बनवण्याची लगबग सुरू आहे.

सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा तालीम संघाची मीटिंग प्रतापगड धवलनगर येथे आयोजित करण्यात आलेली होती. सदरच्या मीटिंगमध्ये निवड चाचणी माळशिरस शहरांमध्ये देण्याचे सर्वानुमते ठरले. निवड चाचणीचे पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांच्याकडे कुस्ती निवड स्पर्धेचे आयोजन नियोजन देण्यात आलेले आहे.


शनिवार दि.३ डिसेंबर व रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. सर्टिफाईड ग्राउंडवर मैदान बनवण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या मल्लांची व्यवस्थित सोय व्हावी, यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन सर्टिफाईड ग्राउंडवर गौतम आबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मैदानामध्ये आखाडा आखण्याचे काम एन आय एस कुस्ती कोच पै. नारायण माने, मुंबई कामगार केसरी ज्ञानेश्वर पालवे मल्लसम्राट व्यायाम शाळेचे वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे, सर्जेराव घोडके, आप्पासाहेब टेळे, किंग मेकर तात्यासाहेब वाघमोडे, बाबासाहेब माने पाटील, पांडुरंग पिसे, खंडूतात्या पवार, सचिन माने, पै. अविनाश कळसुले कालिदास रुपनवर आदी पाहत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
