सराटी येथील जिजामाता महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियान कार्यशाळा संपन्न

सराटी (बारामती झटका)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व जिजामाता महाविद्यालय सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यशाळा महाविद्यालयामध्ये पार पडली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. बाळासाहेब साळुंखे यांनी स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेमध्ये शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन केले. ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ काळाची गरज असून प्रत्येक कार्यक्रम हा घेत असताना त्या कार्यक्रमातून कसलाही कचरा निर्माण होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. घर, शाळा, सरकारी कार्यालये, महाविद्यालये, दवाखाने यातून बाहेर पडणारा कचरा खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, शून्य कचरा व्यवस्थापनानुसार नियोजन केल्यास कचरा नियंत्रित राहील असे मत व्यक्त केले.
सदर कार्यशाळेच्या सकाळ सत्रामध्ये डॉ. रामलिंग सावळजकर यांनी स्वच्छतेकडून समृद्धीकडे या विषयावरती व्यक्त होत असताना, आपल्या भारत देशामध्ये कचऱ्याचे थैमान आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरते. या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावून प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी घेऊन आपले घर ते आपला देश पर्यंतचा स्वच्छता विचार जपावा, असे मत व्यक्त केले.
स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होऊन घर, महाविद्यालय व स्वतःच्या गावामध्ये विद्यार्थी काम करतील. कचऱ्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा नाश होऊन मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील, असा विश्वास जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश लिपारे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मयूर पिसे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विशिष्ट हेतू ठेवून ही कार्यशाळा घेण्यास मंजुरी दिली. या कार्यशाळेतून सराटी गावामधून जनजागृती रॅली तसेच विविध तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पोस्टर्स घेण्यात येणार आहेत, याची रूपरेषा स्पष्ट केली.
तसेच या कार्यशाळेमध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. पाखरे, डॉ. मोरे व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच जिजामाता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद प्रा. प्रतीक्षा चव्हाण, प्रा. रूपाली वाघमोडे, प्रा. प्रज्ञा गिरमे, प्रा. ऋतुजा उबाळे, प्रा. स्नेहा पारेकर, प्रा. अरुणा कोकाटे व शिक्षकेतर कर्मचारी योगेश गायकवाड, गुंडेराव त्रिगुळे, शिवाजी पोळ, सुवर्णा ढोले, वैशाली भोसले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी देशमाने व प्रा. रोहिणी अनपट यांनी केले तर आभार प्रा. विजय गेंड यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.