ताज्या बातम्या

सरकारी कामात अडथळा केले प्रकरणी आरोपींना कोर्टाने सुनावली शिक्षा

ग्रामसेवक यांना मारहाण केल्याप्रकरणी सरपंच पती व सासरे यांच्यावर कारवाई झाली..

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील मौजे आलेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. 4-10-2017 रोजी दुपारी 2-30 वा. ग्रामसेवक प्रवीण संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बनसोडे साहेब, गावातील ग्रामपंचायत सदस्य व इतर काही ग्रामस्थ हे गावातील काँक्रीट रस्ता तयार करण्याच्या अंदाजपत्र याविषयावर चर्चा करत होते. त्यावेळी सरपंच यांचे पती सोमनाथ कांबळे व सासरे विनायक कांबळे हे ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांनी ग्रामसेवक यांना 14 व्या वित्त आयोग विकास कामाच्या आराखड्याबाबत मासिक सभेत घेतलेल्या ठरावाचे काम करू देणार नाही, असे म्हणून त्यांनी शासकीय काम करत असलेल्या ग्रामसेवक यांच्या टेबलवरील सदर कामाची कागदपत्रे फेकून देऊन ग्रामसेवक प्रवीण बनसोडे यांची गच्ची धरली व शिवीगाळी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा इतर लोकांनी सोडवासोडवा केली व बाहेर जाताना सोमनाथ कांबळे यांनी मी तुझ्यावर ॲट्रॉसिटी करेल अशी धमकी दिली.

ग्रामसेवक प्रवीण संजय बनसोडे यांनी सरकारी काम करीत असताना अडथळा आणला, मारहाण, दमदाटी व शिवीगाळी केली म्हणून टेंभुर्णी पोलीस ठाणेस येऊन आरोपी 1) सोमनाथ विनायक कांबळे, 2) विनायक जिजाबा कांबळे दोघे रा. आलेगाव, ता. माढा यांचे विरुद्ध टेंभूर्णी पोलीस ठाणेस गु.र.नं 431/2017 भा.द.वि. कलम 353,323, 504, 506,34 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ASI/ शिवाजी शेलार यांनी करुन आरोपींविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी 5 साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार ASI/ शिवाजी शेलार यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी मा. न्यायालयासमोर मांडले.

सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता मा. जिल्हा न्यायाधीश श्री. एल. एस. चव्हाण साहेब यांनी आरोपी 1) सोमनाथ विनायक कांबळे, 2) विनायक जिजाबा कांबळे दोघे रा. आलेगाव खुर्द, ता. माढा, यांना भादविक 353 अन्वये दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी 15,000/- रुपये (एकूण 30,000/-) दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

सरकार पक्षा तर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी काम पाहीले. सदर केसमध्ये मा. श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व मा. श्री. दिपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button