सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ते सुरक्षा सप्ताहात प्रजासत्ताक दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम..

रस्ते सुरक्षा सप्ताहामध्येच नाही तर कायमच सुरक्षा सप्ताहाचे नियम कर्मचाऱ्यांनी पाळावे – कार्यकारी अभियंता सुनीता पाटील
अकलूज (बारामती झटका)
26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना मोटरसायकल वरून प्रवास करताना सुरक्षितता व्हावी यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू केलेला आहे. या सप्ताहामध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटण्यात आले. यावेळी उपअभियंता डाके साहेब, मस्के साहेब, कास्ते साहेब, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व बांधकाम विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करून तंतोतंत पालन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहामध्येच नाही तर कायमच सुरक्षा सप्ताहाचे नियम पाळावे, असे कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता सुनिता पाटील मॅडम यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. बेफिकीर व बेजबाबदार वाहन चालकांमुळे अपघात होत आहेत. ओव्हरटेक करताना काळजी घेणे, स्पीड ब्रेकर समोर दिसल्यानंतर वाहनाची गती कमी करावी, जवळ आल्यानंतर ब्रेक दाबल्याने पाठीमागून किंवा समोरच्या वाहनाला धडक बसण्याची शक्यता असते, वळताना पाठीमागे पाहून व हाताची दिशा दाखवून वळावे अशा अनेक सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. कार्यकारी अभियंता सुनीता पाटील मॅडम यांच्या स्तुत्य उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.