सासरच्या जाचास कंटाळून 39 वर्षे विवाहितेची वेळापूर मध्ये आत्महत्या
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथील सौ. सुचिता अमोल घाडगे (वय ३९ वर्षे) यांनी सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत मयत सौ. सुचिता यांचे भाऊ हेमंत एकनाथ साळुंखे यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल पती अमोल घाडगे व सासू सुनंदा दिलीप घाडगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
सदर फिर्यादीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मी हेमंत एकनाथ साळूंखे वय ३६ वर्ष धंदा खाजगी नोकरी रा. शांतीनगर, उल्हासनगर ३. बॅरेक नंबर ११९६ कल्याण जि. ठाणे सध्या रा. कोठारेगाव, बंडुकाका बच्चाव फॉर्म ता. मालेगाव, जि. नाशिक, समक्ष पोलीस ठाणेस हजर राहून फिर्यादी जबाब देतो की, मो. नं ९५०३५३३२२० मी वर नमूद ठिकाणी माझी पत्नी सौ. सोनाली, मुलगा विनायक असे दोघे राहणेस असून बंडूकाका बच्चाव यांचे पोल्ट्री फार्ममध्ये मॅनेजर म्हणून काम करतो, त्यावर उपजीविका भागवितो. फार्म मेवेल बाद बापू शिवराय उपजिविका भागवितो. माझे आई-वडील कल्याण येथे राहण्यास आहेत. मला पाच बहिणी १) चंदा बापू शिंदे २) मंदा मारुती शिंदे दोघे रा. श्रीपुर, ता. माळशिरस, ३) संगीता शक्तीकुमार गायकवाड रा. सोलापूर ४) सुचिता अमोल घाडगे रा. वेळापूर ता. माळशिरस (मयत) ५) बबिता दिपक ढगे रा. भांडुप कल्याण, जि. ठाणे असे बहीणी असून सर्वांची लग्न झालेली असून त्याचे सासरी नांदणेस आहेत. मयत बहीण सुचिता अमोल घाडगे हिचे २००७ साली वेळापूर ता. माळशिरस येथील अमोल दिलीप घाडगे यांचेसोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे योग्य तो मानपान करून श्रीपूर येथे आम्ही थाटामाटात लग्न करून दिलेले होते. बहीण सुचिता हिचे सासरी १) पती – अमोल घाडगे २) सासू – सुनंदा दिलीप घाडगे यांचेसह राहत होती. लग्नानंतर तिला विजय, अजय असे दोन मुले झाले होते. दाजी अमोल घाडगे यांचे वडील मयत झाल्याने त्याचे जागेवर अनुकंपामध्ये मागील तीन वर्षापासून दाजी अमोल घाडगे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. सोलापूर येथे शिपाई म्हणून नोकरी करतात.
लग्नानंतर बहीण सुचिता हिस दुसरा मुलगा झाल्यापासून तिचे सासरचे लोक चांगले नांदवत होते. त्यानंतर सन २०१० पासून बहीण सुचिता हिस तिचे पती दिलीप घाडगे यांनी घरातील किरकोळ कारणावरून त्रास देण्यास चालू केले होते. सुचिता हिस तिचे पती अमोल हे तिला, “तु आमचे ऐकत नाही, उलट का बोलते, तुझे चारित्र चांगले नाही”, या कारणावरून तिचेशी नेहमी भांडण तक्रार करून उपाशीपोटी ठेवणे, टोचून बोलणे, विनाकारण शिवीगाळी करून बहीण सुचिता हिला शारीरीक व मानसिक त्रास देत होते. सुचिता हिची सासू सुनंदा ही दाजी अमोल यास बहीण सुचिता ही “मुलाकडे लक्ष देत नाही, परपुरुषासोबत बोलते” असे वाढवून खोटे मुलगा अमोल यास सांगत होती. मागील पाच वर्षांपासून दाजी अमोल हे बहीण सुचिता हिचेवर चारित्राचा संशय घेवून कोणत्या ना कोणत्या कारणावरून काही कारण नसताना बहीण सुचिता हिस लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा जाचहाट छळ करत असलेबाबत बहीण सुचिता ही अधूनमधून माहेरी आलेनंतर आम्हास समक्ष सांगत होती. तेंव्हा आम्ही तिची समजूत काढून व तिचे पती अमोल यांना समजावून सांगून तिला सासरी पाठवित होतो. त्यानंतरही तिचे सासरचे लोक पती अमोल व सासू सुनंदा घाडगे हे बहीण सुचिता हिचे घरगुती कारणावरून घालून पाडून बोलून जाचहाट छळ करतच होते. बहीणीस होत असलेल्या छळाबाबत त्याचे दीर अतुल घाडगे यांना कळवूनही दाजी अमोल व सासू सुनंदा यांचे वागणेत फरक पडलेला नव्हता.
सन २०२१ मध्ये दाजी अमोल घाडगे हे त्याचे मयत वडीलांचे जागेवर अनुकंप तत्वावर शिपाई म्हणून नोकरीस लागले होते. सन २०२२ पासून दाजी अमोल हे सोलापूर येथे नोकरीस होते. एक वर्षे त्यांनी सोलापूर येथून सुट्टी दिवशी वेळापूर येथे घरी ये-जा करत होते. अमोल हे सुट्टी दिवशी घरी आल्यावर पुन्हा परत जाईपर्यत तिच्या चारीत्र्यावर संशय घेत होता व सुनंदा घाडगे ही मुलगा अमोल यांस बहीणी बद्दल खोटे काहीतरी सांगून कान भरवत होती. त्याच कारणावरून अमोल हे बहीण सुचिता हिस वारंवार शिवीगाळी करून मारहाण करत असलेबाबत बहीण सुचिता ही फोन करून आम्हास सांगत होती. सन २०२३ मध्ये दाजी अमोल हे बहीण सुचिता व दोन्ही भाच्चे यांना सोलापूर येथे राहण्यासाठी घेवून गेले होते. त्या ठिकाणी पण दाजी अमोल हे बहीण सुचिता हिचे चारीत्र्यावर संशय घेवून घरातील कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देणे चालू ठेवले होते. त्यावेळी मी, भाचा अशीष बापू शिंदे, बहीण संगिता गायकवाड व दाजी शक्तीकुमार गायकवाड असे सोलापूर येथे जावून दाजी अमोल यांना बहीण सुचिता हिस त्रास करू नका, असे समजावून सांगण्यासाठी गेलो असता त्यावेळी दाजी अमोल हे आम्हास तुम्हाला काय करायचे आहे ते करा, सुचिता हिला घेवून जावा, मी तिला त्रास देणार असे म्हणाल्याने बहीण सुचिता हिस सोलापूर येथून आमचे घरी घेवून आलो होतो. त्यानंतर दहा दिवसांनी दाजी अमोल हे यापुढे सुचिता हिस त्रास देणार नाही एक वेळा माफ करा, असे म्हणाल्याने सुचिता हिस पुन्हा नांदणेस सोलापूर येथे पाठविले होते. त्यानंतरही दाजी अमोल यांचे बहीण सुचिता हिस त्रास देणे चालूच होते. दाजी अमोल हे वारंवार बहीण सुचिता हिस त्रास देत असल्याने बहीण सुचिता ही वेळापूर येथे मागील सहा महिन्यापासून मुलांसोबत राहणेस होती. वेळापूर येथे राहणेस असताना बहीण सुचिता हि अमोल यांना किराणा सामान भरण्यास सांगितल्यावर अमोल हे बहीण सुचिता हिस “तुझे बापाकडून किराणा सामान घेवून ये, तु धंद्यावर जा, कोणाखाली तरी पड जा” असे वारंवार बोलत होता. अधून मधुन बहीण सुचिता हीला किराणा सामान घेण्यासाठी फोन पे वरून पैसे पाठवत होतो. जुन २०२४ मध्ये दाजी अमोल यांनी बहीण सुचिता हिचे चारीत्र्यावर संशय घेवून वेळापूर येथील राहते घरी बुटाने पाठीत लाथ मारली होती. त्यानंतर दोन दिवसांनी मणका दुखू लागलेबाबत बहीण सुचिता हिने सांगून तात्काळ वेळापूर येथे घरी या किंवा पतीचे व सासूचे त्रासाला कंटाळून मी जिवाचे बरे वाईट करून घेणार आहे, असे आम्हांस फोनवरून सांगितल्याने त्यावेळी मी बहीण मंदा शिंदे, चंदा शिंदे, भाच्चा आशीष शिंदे असे मिळून पुन्हा दाजी अमोल यास समजावून सांगण्यासाठी वेळापूर येथे आलो होतो. त्यावेळी दाजी अमोल व सासू सुनंदा यांना समजावून सांगितले होते. त्यानंतरही दाजी अमोल व सुनंदा घाडगे हे दोघे बहीण सुचिता ही आजारी असतानाही त्रास देत असलेबाबत बहीण सुचिता फोनवरून सांगत होती. मागील तीन वर्षात दाजी अमोल हे बहीण सुचिता हिला वारंवार त्रास देत असल्याने १०-१२ वेळा माहेरी आमचे घरी घेवून आलो होतो.
दि. ०३/१२/२०२४ रोजी रात्री ०७.३० च्या सुमारास मी श्रीपूर येथे बहीणीकडे असताना भाच्चा आशीष शिंदे यांनी फोन करून मावशी सुचिता घाडगे हीने वेळापूर येथील राहते घरी गळफास घेतले आहे, असे कळविले. त्यावेळी मी माझे नातेवाईक यांना कळवून मी, दोन बहीणी चंदा शिंदे, मंदा शिंदे, भाच्चा अक्षय शिंदे, दाजी मारूती शिंदे असे मिळून वेळापूर येथे बहीणीचे घरी येवून पाहीले असता बहीण सुचिता हीने तिच्या राहत्या घरातील बेडरूम खोलीमध्ये सिलींग फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले व बेडरूम खोलीचा दरवाजा वरील बाजूस कापल्याचे दिसले. त्यानंतर पोलीसासमोर बहीणीचे गळफास सोडवून प्रेत खाली जमीनीवर उतरविले. पोलीसांनी मयत बहीण सुचिता हिचे पोस्टमार्टम झालेनंतर तिचे प्रेताचे अंत्यविधी झाल्यानंतर घडले प्रकाराबाबत तक्रार देणेकरीता पोलीस ठाणेस आलो आहे.
तरी माझी बहीण सुचिता अमोल घाडगे वय ३९ वर्षे रा. वेळापूर, ता. माळशिरस हिचे लग्न झालेनंतर २०१० पासून ते दि. ०३/१२/२०२४ रोजी पर्यंत तिला १) पती – अमोल दिलीप घाडगे २) सासू – सुनंदा दिलीप घाडगे दोघे रा. वेळापूर यांनी मिळून बहीण सुचिता हिस “तु आमचे ऐकत नाही, उलट का बोलते, तुझे चारित्र चांगले नाही, मुलाकडे लक्ष देत नाही, परपुरुषासोबत बोलते, तुझे बापाकडून किराणा सामान घेवून ये, तु धंद्यावर जा, कोणाखाली तरी पड जा” व तिचे चारित्रावर संशय घेवून तिला घालून पाडून बोलून शिवीगाळी करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तिला शारीरीक व मानसिक त्रास देवून तिचा जाचहाट छळ केला. त्या छळास कंटाळून बहीण सुचिता अमोल घाडगे वय ३९ वर्षे रा. वेळापूर, ता. माळशिरस हीने राहत्या घरातील बेडरूममधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. म्हणून माझी अमोल दिलीप घाडगे २) सुनंदा दिलीप घडगे दोघे रा. वेळापूर यांचेविरूध्द तक्रार आहे.
माझा संगणकावर टंकलिखीत केलेला फिर्यादी जबाब मी वाचून पाहीला, तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे. असा फिर्यादी जबाब नोंदवण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास वेळापूर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/