सत्ताधाऱ्यांनी दलित बांधवांना विकासापासून वंचित ठेवलेले, याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही – नगरसेवक कैलास वामन

महिन्याभरात जर महापुरुषांच्या स्मारकाचे काम सुरू नाही झाले तर पुढच्या महिन्यामध्ये याच ठिकाणी आंदोलन केले जाईल – रेश्माताई टेळे माजी नगरसेविका
दलित वस्तीसाठी आलेला निधी जर अन्य ठिकाणी वळवला तर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल – माजी सरपंच विकासदादा धाईंजे
माळशिरस (बारामती झटका)
अनुसूचित जाती प्रवर्गांमधून मी निवडून आलेलो आहे, दलित वस्तीचा निधी प्राधान्याने अनुसूचित जातीतील प्रभागांना द्यायला पाहिजे मात्र, माझ्या प्रभागामध्ये दलितवस्तीचा निधी खर्च केलेला नाही. दलित बांधवांना विकासापासून सत्ताधाऱ्यांनी वंचित ठेवलेले आहे, याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. तसेच कमळमळा येथील जय तुळजाभवानी मंदिराच्या सभा मंडपाचा वळवलेला निधी परत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक कैलास वामन यांनी धरणे आंदोलन प्रसंगी बोलताना सांगितले.


यावेळी माजी नगरसेविका रेश्माताई टेळे, माजी नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे, पांडुरंग वाघमोडे, पंचायत समिती माजी सदस्य अनिल सावंत, सोमनाथ वाघमोडे, शामराव वाघमोडे, संदीप माणिकराव वाघमोडे, मोहन टेळे, आप्पासो वाघमोडे, रशीदभाई शेख, संजय वाघमोडे, संतोष वाघमोडे, नितीन जाधव, संतोष टेळे, आमिर शेख, बाबा शेख, कमाल शेख, किशोर सिद, अज्ञान टेळे, श्रीपती वाघमोडे, किरण तूपसौंदर, रमेश कुचेकर, सोनू मिसाळ, बाबा वामन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, यांच्यासह कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक कैलास वामन यांनी माळशिरस नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले होते. माजी नगरसेविका रेशमाताई टेळे बोलताना म्हणाल्या, माळशिरस विधानसभेचे तात्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस शहरातील महापुरुषांना कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दोन कोटी, छत्रपती शिवाजी महाराज एक कोटी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंच्याहत्तर लाख, महात्मा ज्योतिबा फुले पन्नास लाख, राजे नरवीर उमाजी नाईक पन्नास लाख असे निधी मंजूर केलेले होते. सदरच्या कामाचा कार्यारंभ आदेश होऊन सुद्धा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू आहे. अन्य महापुरुषांचे काम रखडलेले आहे.

एक महिन्यात जर महापुरुषांच्या स्मारकाचे काम सुरू नाही झाले तर पुढच्या महिन्यांमध्ये याच ठिकाणी आंदोलन केले जाईल असा इशारा रेश्माताई टेळे यांनी दिला. माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे यांनी माळशिरस नगरपंचायतीमध्ये दलित वस्तीसाठी आलेला निधी जर अन्य ठिकाणी वळवला तर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा दिला आहे.


नगरपरिषदेचे कर निरीक्षक अविनाश काळाने, कार्यालयीन कक्ष अधिकारी विशाल सावंत, सुनील मदने यांनी आंदोलनकर्त्याकडून निवेदन स्वीकारले..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



