सवतगव्हाण येथे ह. भ. प. पांडुरंग माने महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार संपन्न

लोकनेते कै. प्रकाशराव निंबाळकर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
सवतगव्हाण (बारामती झटका)
सवतगव्हाण ता. माळशिरस येथे लोकनेते कै. प्रकाशराव पांडुरंग निंबाळकर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. पांडुरंग माने महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन शुक्रवार दि. १९/०१/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सवतगव्हाण येथे संपन्न होणार आहे.
लोकनेते कैलासवासी प्रकाशराव निंबाळकर पाटील हे माळीनगर गावचे माजी सरपंच होते. माळीनगर पंचक्रोशीत ते पका पाटील या नावाने सुपरीचीत होते. त्यांचा स्वभाव सुसंस्कृत व स्वच्छ विचारसरणीचे होते. जनमाणसांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली होती. त्यांनी समाजामध्ये विविध कार्यातून आपली ओळख निर्माण केली होती.

लोकनेते कैलासवासी प्रकाशराव निंबाळकर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त निंबाळकर पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.