ताज्या बातम्याराजकारण

अकलूजमध्ये माने पाटील यांची अकलूज नगर परिषद निवडणुकीत जिरवली, बॅनरने तणाव निर्माण झाला होता.

खरंतर माने पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायत असताना खऱ्या अर्थाने जिरवली होती…

अकलूज नगर परिषद व पोलीस स्टेशन यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आक्षेपार्ह बॅनर हटवून पोलीस स्टेशनला जमा केले..

अकलूज (बारामती झटका)

आशिया खंडात सर्वात मोठी समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक रंगतदार व चुरशीची झालेली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्षा सौ. रेश्मा लालासाहेब आडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे 20, उबाठा 02 असे 22 नगरसेवक तर भाजप 04 नगरसेवक निवडून आलेले आहेत. निकालानंतर अशोका चौक, मार्केट कमिटी गेट व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर या ठिकाणी विजयी उमेदवारांचे शुभेच्छापर बॅनर लावलेले होते. त्यावर माने पाटील यांची जिरवली, असा आक्षेपार्ह मजकूर असल्याने भाजप व महायुतीचे कार्यकर्ते व माने पाटील समर्थक आक्रमक झालेले होते. अकलूजमध्ये तणाव निर्माण झालेला होता. अकलूज नगर परिषद व पोलीस स्टेशन यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आक्षेपार्ह बॅनर हटवून पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील यांच्या भावजय सौ. ज्योतीदेवी गणपतराव माने पाटील व पुतण्या श्री. गिरीराज गणपतराव माने पाटील यांचा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निसटता पराभव झालेला होता. निकालानंतर जाणीवपूर्वक विकृत बुद्धीतून बॅनर लावलेले होते. अकलूज परिसरामध्ये सदरच्या बॅनर नंतर चर्चा होती. खरं तर माने पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायत असताना खऱ्या अर्थाने मोहिते पाटील यांची जिरवली होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांचा गिरीराज गणपतराव माने पाटील यांनी पराभव केलेला होता.

अकलूज ग्रामपंचायत असताना त्यावेळेस माने पाटील यांनी थेट मोहिते पाटील यांचा पराभव केलेला होता. अकलूज नगर परिषद निवडणुकीत माने पाटील यांचा पराभव थेट मोहिते पाटील यांच्याकडून झालेला नाही. असे असताना आक्षेपार्ह बॅनर लावण्या पाठीमागे कोण चाणक्य असावा, अशीही चर्चा तर्कवितर्क लावत अकलूज पंचक्रोशीत सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom