शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्या निवासस्थानी उत्तमराव जानकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली.

“चर्चा तर होणारच” बाबाराजे देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस केली मात्र, अनेक नेत्यांच्या तब्येती बिघडल्या..
नातेपुते (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे मुधोजीराव देशमुख यांच्या निवासस्थानी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन बाबाराजे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र, अनेकांच्या तब्येती बिघडल्या असल्याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे.
बाबाराजे देशमुख यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. बऱ्याच वेळा कार्यक्रम, लग्न समारंभ यामध्ये बाबाराजे देशमुख आणि उत्तमराव जानकर यांच्या भेटीगाठी झालेल्या असतील. मात्र, देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतलेली असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. यावेळी उत्तमराव जानकर यांच्या सोबत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे होते, त्यामुळे उलट सुलट चर्चा तर होणारच…


सध्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर या कारखान्याची निवडणूक सुरू होतेय. या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट घेतलेली आहे का ?, असाही सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. राजकीय भाग सोडला तर राजकारणाच्या पलीकडे सुखदुःखामध्ये एकमेकांच्या राजकीय भेटीगाठी घेणे गैर नाही असेही बोलले जाते.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात खऱ्या अर्थाने श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर या कारखान्याला वैभव प्राप्त करीत असताना मुधोजीराव तथा नानासाहेब देशमुख यांचेही फार मोलाचे योगदान आहे. त्यामुळे बाबाराजे यांच्या तब्येतीची विचारपूस केली मात्र, अनेकांच्या तब्येती बिघडल्या, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.