शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी लक्ष्मी बंदपट्टे तर उपाध्यक्ष पदी विनंती दुपडे

कोळेगांव (बारामती झटका) सतिश पारसे यांजकडून
कोळेगांव ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व्यवस्थापन समिती च्या नूतन पदाधिकारी यांच्या नुकत्याच निवडी करण्यात आल्या. यामध्ये अध्यक्षपदी लक्ष्मी अमोल बंदपट्टे यांची तर उपाध्यक्ष पदी विनंती अनिल दुपडे यांची निवड करण्यात आली.

तसेच सदस्य पदी दत्तात्रय पारसे, सोनाली पारसे, कुमार सावंत, मोहिनी वाघमारे, अनिल सावंत, श्रीमंत पारसे, शीतल बेंदगुडे, अनिल पारसे, नागनाथ सावंत तसेच ग्रामपंचायत सदस्य केशव सावंत तर शिक्षक तज्ञ हिंदुराव पारसे, शिक्षक सदस्य रुक्मिणी पारसे, नवनाथ धांडोरे तर सचिव पदी मुख्याध्यापक मुश्ताक जमादार यांची निवड झाली.
यावेळी दिनेश पारसे, लक्ष्मण पारसे, चंद्रशेखर पारसे, सुरेश बंदपट्टे, सुभाष बंदपट्टे, दत्तात्रय गेजगे, राणोबा पारसे, अमोल पारसे, लिंगाप्पा पारसे, शिवाजी गेजगे, सचिन धोत्रे यांसह पालक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्व सदस्यांचे कोळेगांवचे सरपंच, उपसरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.