डॉ. सौ. वैष्णवी शेटे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबतचा माफीनामा…

अकलूज (बारामती झटका)
बारामती झटका वेब पोर्टल व यूट्यूब चैनल संपादक मालक या नात्याने मी. श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील आमच्या पोर्टलमध्ये दि. 25/02/2024 रोजी मिळालेल्या चुकीच्या माहिती आधारे बातमी प्रसारित केली. त्यामुळे डॉ. वैष्णवी विनोदकुमार शेटे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून नाहक बदनामी झालेली आहे. चुकीच्या पद्धतीने माहिती मिळाल्याने बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे, त्याबद्दल डॉ. सौ. वैष्णवी शेटे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत जाहीर माफीनामा प्रसिद्ध करित आहे.
मिळालेली माहिती अशी कि, वैष्णवी शेटे यांच्याकडून अकलूज बस स्थानकासमोर बेकायदेशीर रित्या ऍलोपॅथीची व स्त्री रोग तज्ञ याची प्रॅक्टिस या मथळ्याखाली डॉ. सौ. वैष्णवी विनोदकुमार शेटे तसेच डॉ. श्री. विनोदकुमार विश्वनाथ शेटे व त्यांचे शेटे मॅटरनिटी होम या नावाने असलेल्या हॉस्पिटलच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे बातमी प्रसारित केली होती. त्या बातमीत डॉ. वैष्णवी विनोद शेटे व त्या नोकरी करीत असलेल्या शेटे मॅटरनिटी होमबाबत बातमी प्रसिद्ध होऊन त्यांची बदनामी होऊन त्यांचे चारित्र्यबाबतही मजकूर होता. सदरची बातमी प्रसारित झाल्यानंतर डॉ. सौ. वैष्णवी विनोदकुमार शेटे यांनी ॲड. श्री. डी. ए. फडे यांचे मार्फत मला दि. 18/03/2024 रोजी नोटीस पाठवली होती. ती नोटीस मिळाल्यानंतर दि. 25/02/2024 रोजी प्रसारित केलेल्या बातमीतील मजकुराची शहानिशा करून त्यांचे अधिक चौकशी केली असता त्या बातमीत झालेला मजकूर व मला मिळालेली माहिती चुकीची असलेबाबत मला समजले. मला मिळालेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसारित केलेल्या बातमीमुळे डॉ. वैष्णवी विनोद कुमार शेटे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून त्यांची नाहक बदनामी झाली आहे.
आता मला ज्या व्यक्तीने माहिती दिली होती ती, चुकीची माहिती झाल्याने व त्या व्यक्तीने माझ्याकडे तसा जबाब दिलेला आहे. त्यामुळे मी हा आज रोजी माफीनामा लिहून देत आहे. माझ्या बारामती झटका न्यूज पोर्टलला डॉ. सौ. वैष्णवी विनोदकुमार शेटे यांच्याबद्दल जी बातमी प्रसारित केली ती पूर्णपणे चुकीची असून डॉक्टर म्हणून रुग्णांना देत असलेली सेवा ही योग्य, तत्पर व चांगली अशी आहे. त्या समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे मला मिळालेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे माझेकडून प्रसारित झालेल्या बातमीमुळे डॉ. वैष्णवी विनोदकुमार शेटे यांची जी नाहक बदनामी झालेले आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून माफीनामा जाहीर करीत आहे. इथून पुढे डॉ. सौ. वैष्णवी विनोदकुमार शेटे अगर शेटे मॅटनिर्टी या हॉस्पिटलबाबत बदनामी होईल, अशा स्वरूपाची मजकुराची भविष्यात कसलीही बातमी प्रसारित करणार नाही..
संपादक
श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.