शंकरराव मोहिते महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कलाकारांचा सत्कार समारंभ संपन्न
संग्रामनगर (बारामती झटका)
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर या ठिकाणी नुकताच संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तसेच यावर्षीचा उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट कलाकार, गोल्डन गर्ल, गोल्डन बाॅय याचा मान देखील शंकराव मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थी नागनाथ साळवे व तेजस्विनी केंद्रे यांनी मिळवला. त्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देऊन या युवा कलाकारांचा व या संघास मार्गदर्शन करणारे सर्व माजी विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड, संघ व्यवस्थापक डॉ. अपर्णा कुचेकर, डॉ. चंकेश्वर लोंढे, डॉ. हनुमंतराव अवताडे, डॉ. दत्तात्रय बारबोले कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे व युवा महोत्सवात सहभागी झालेले सर्व कलाकार विद्यार्थी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये
बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील
98 50 10 49 14 हा नंबर समाविष्ट करावा..