शरद भोसले आदर्श कलाध्यापक पुरस्काराने सन्मानित

खंडाळी (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा (सन २०२४-२५) जिल्हास्तरीयआदर्श कलाध्यापक पुरस्कार ज्ञानगंगा बालविकास मंडळ खंडाळी संचलित, श्रीमती पार्वतीबाई ननावरे हायस्कूल खंडाळी, ता. माळशिरस, येथील कलाशिक्षक शरद भोसले यांना माजी प्राचार्य सुदर्शन देवरकोंडा यांच्या हस्ते व गोपाळ डांगे, भंवर राठोड, धर्मेश टंक, गोपीनाथ नवले, सतीश सुभेदार, संघाचे सहकार्यवाहक दिपक कन्ना, अध्यक्ष गणेश तडका, सचिव मुकुंद मोरे, कार्याध्यक्ष देवेंद्र निंबर्गीकर, सुरेश मलाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर येथे देण्यात आला.
तसेच खंडाळी हायस्कूल मधील आशुतोष खटके इ. २ री रंगभरण प्रथम क्रमांक, अतिश मगर इ. ६वी द्वितीय क्रमांक, श्रेया कटके इ. ८वी द्वितीय क्रमांक, मराठी हस्ताक्षर कोमल काळे इ. ८वी द्वितीय क्रमांक, इंग्रजी हस्ताक्षर सृष्टी म्हसवडे इ. ७ वी प्रथम क्रमांक मिळाला असून यांना कलाध्यापक संघाच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कलाशिक्षक शरद भोसले व प्रशालेतील विद्यार्थ्यांचे प्रशालेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.