शरदचंद्र पवार यांची माढा लोकसभेची धनगर समाजास उमेदवारी देण्याची मानसिकता, मराठा समाजाची भूमिका स्पष्ट नाही….

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर महायुतीत गेल्याने पवार साहेब नव्या धनगर समाजाच्या उमेदवाराच्या शोधात..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या निवडणुकीत बहुचर्चित असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजप व महायुतीकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीचा अद्यापपर्यंत उमेदवार ठरलेला नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेवराव जानकर महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता होती, तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्याशी चर्चा होऊन माढा लोकसभेमध्ये महादेवराव जानकर यांना महाविकास आघाडी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजप व महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडवणीस, अजित दादा पवार यांची बैठक होऊन सदरच्या बैठकीमध्ये महायुतीत पुन्हा महादेवराव जानकर राहिलेले आहेत.
महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार यांना माढा लोकसभेची उमेदवारी धनगर समाजास देण्याची मानसिकता आहे. सध्या मराठा आरक्षणावरून मराठा समाजाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मराठा आरक्षणाबरोबर, का मराठा समाजाच्या नेत्यांबरोबर अशी अद्यापपर्यंत भूमिका नसल्याने शरदचंद्रजी पवार मराठा समाजाचा उमेदवार देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत.
धनगर समाजाचा उमेदवार माढा लोकसभा मतदार संघात दिल्यानंतर खऱ्या अर्थाने बारामती लोकसभा मतदार संघातील धनगर समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना फायदा होईल, यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजास उमेदवारी देण्याच्या मानसिकतेमध्ये महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.