ताज्या बातम्याराजकारण

शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारीकडून माढा विधानसभेसाठी युवा नेते रणजीतसिंह शिंदे यांची उमेदवारी निश्चित…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह न मिळाल्यास अपक्ष म्हणून रणजीत शिंदे माढा विधानसभा लढवणार – षटकार आमदार बबनदादा शिंदे

महाळुंग (बारामती झटका)

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह बबनराव शिंदे हे उमेदवार असणार आहेत. मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी स्वतः देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा प्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे तुतारी या आपल्या पक्षाचे चिन्ह मिळावे म्हणून मागणी केली आहे. माझी प्रकृती सध्या बरी नसते, त्यामुळे माझा मुलगा रणजीतसिंह शिंदे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचेही मी पवार यांना आवर्जून सांगितले. मागील ३८ वर्ष मी व माझे शिंदे कुटुंबीय शरदचंद्रजी पवार यांच्याशी एकनिष्ठ होतो… आहोत व पुढेही राहणार आहोत हे निश्चित. आदरणीय शरदचंद्र पवार यांनी आम्हाला पक्ष सदस्यत्व देऊन तुतारी चिन्ह दिले तर आनंदच होईल पण जर त्यांनी तुतारी चिन्ह नाही दिले तरीही आमची अपक्ष उमेदवार म्हणून व शक्यतो छत्री या चिन्हावर निवडणूक माढा मतदारसंघात रिंगणात उतरून लढण्याची तयारी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेले होते.

याप्रसंगी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कान्हापुरी (पंढरपूरचे) चे सरपंच प्रेम चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, संचालक सचिन देशमुख आदी प्रमुख मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

विधानसभेची आचारसंहिता सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे अंतर्गत जागावाटप सुरू झालेले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट व काँग्रेस आय पक्ष यांचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलेले असून माढा विधानसभेची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची जागा सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजीतभैय्या शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झालेला आहे. त्यामुळे माढा विधानसभेत रणजीतसिंह शिंदे तुतारी चिन्हावर लढणारच अशी खास गोटातून माहिती आलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button