शारदीय नवरात्रीचे नऊ रंग

मळोली (बारामती झटका)
आज गुरुवार दि. ऑक्टोबर २०१४ रोजी घरोघरी घटस्थापना करण्यात आली. प्रत्येक घरामध्ये आणि गावातील मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहाने आणि भक्तिभावाने करण्यात आली.
आज पासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे. देवीसाठी नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या असतात यामध्ये पहिल्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी पिवळ्या रंगाची साडी, दुसऱ्या दिवशी ४ ऑक्टोबर रोजी हिरवा रंग, तिसरा दिवस ५ ऑक्टोबर रोजी राखाडी रंग, चौथा दिवस ६ ऑक्टोबर रोजी नारंगी रंग, पाचवा दिवस ७ ऑक्टोबर पांढरा रंग, सहावा दिवस ८ ऑक्टोबर लाल रंग, सातवा दिवस ९ ऑक्टोबर निळा रंग, आठवा दिवस १० ऑक्टोबर गुलाबी रंग, नववा दिवस ११ ऑक्टोबर जांभळा रंग, अशा रंगांच्या साड्या देवीला परिधान करण्यात येणार आहेत.

शारदीय नवरात्रोत्सवात सगळीकडे देवीचा गजर केला जातो. पहाटे काकडा आरती आणि नंतर दिवसभर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यावेळी नऊ दिवस उपवास करून भक्तिभावाने देवीचे नामस्मरण केले जाते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.