ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मोहिते पाटील गटाला खिंडार, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार….

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख गट मा. आ. राम सातपुते यांच्या संपर्कात…

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर नगरीचे थोर सुपुत्र माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते सूर्यकांत दादा माने देशमुख यांचा राजकीय गट भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या संपर्कात आहेत. लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याने माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मोहिते पाटील गटाला खिंडार पडणार, अशी राजकीय परिस्थिती आहे.

माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीत स्वर्गीय दत्तोजीराव माने देशमुख यांना मोहिते पाटील घराण्याने सर्वतोपरी सहकार्य केलेले होते. त्यानंतर सूर्यकांत दादा यांनी वेळापूर पंचक्रोशीमध्ये मोहिते पाटील यांचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवलेले होते. माळशिरस पंचायत समितीचे सभापती व सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना अनेक शासकीय स्तरावरील रस्ते, लाईट, वीज, पाणी, अशा अनेक सुख सुविधा उपलब्ध करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे लोकनेते बनलेले होते. वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी सभासद यांना वेळोवेळी खते, बी-बियाणे व आर्थिक सहकार्य करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावलेले होते. सूर्यकांत दादांचा शब्द प्रमाण मानला जात होता. याचा फायदा सहकार महर्षी पासून तिसऱ्या पिढीपर्यंत झालेला आहे. मात्र, स्वर्गीय सूर्यकांत दादा माने यांच्या दुसऱ्या पिढीला सपत्नीक वागणूक देऊन सूर्यकांत दादा यांचा गट राजकारणातून कोसो दूर नेऊन ठेवलेला आहे. मोहिते पाटील यांनी माने देशमुख यांच्या विरोधामध्ये कायमछुपी ताकद देऊन आजपर्यंत गावच्या सत्तेपासून माने देशमुख परिवार अलिप्त ठेवलेला आहे. राजकीय षडयंत्र करण्याचे काम सुरूच आहे.

स्वर्गीय सूर्यकांत दादा यांचा वारसा पुढे जपण्याकरता मोहिते पाटलांकडून राजकीय मुस्कटदाबी होत असल्याने सूर्यकांत दादा यांचे वारसदार अमृतराज, अमरसिंह, अभय उर्फ आनंदराज यांनी मोहिते पाटील गटाला सोडचिट्टी देऊन माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या समवेत राजकारण करून स्वर्गीय सूर्यकांतदादा यांचा गट पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याकरता आग्रही झालेले आहेत. अभय उर्फ आनंदराज हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यावर सचिव पदावर कार्यरत होते. त्यांनी सचिव पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्रिमूर्तींनी लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा यांचे विचार पुन्हा जनमानसात रुजवण्याकरता मनाशी खुणगाठ बांधलेली आहे. मोहिते पाटील यांना सोडल्याशिवाय लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा यांचे जनतेचे स्वप्न साकार होणार नाही. यासाठी त्रिमूर्तींनी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या समवेत प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. त्रिमूर्तींच्या निर्णयाचे माने देशमुख परिवारांसह सूर्यकांत दादा गटांची सर्वांची अनुमती आहे. अमृतराज, अमरसिंह व अभय उर्फ आनंदराज लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मोहिते पाटील गटाला खिंडार पडणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom