ताज्या बातम्या

शेंडेवाडी विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना 15% डिव्हिडंटची परंपरा कायम…

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन उमाजी बोडरे यांचा सभासदांसाठी धाडसी निर्णय…

फोंडशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठी उलाढाल असलेली शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित तामशीदवाडी या संस्थेने माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्यक्षम चेअरमन उमाजी बोडरे यांनी सभासदांसाठी धाडसी निर्णय घेऊन शेंडेवाडी विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना 15 टक्के डिव्हिडंट देण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे.

फोंडशिरस पंचक्रोशीत शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित, तामशीदवाडी या संस्थेची स्थापना 07 फेब्रुवारी 1958 साली झालेली आहे. सदरच्या संस्थेचे भव्य दिव्य कार्यालय फोंडशिरस येथे आहे. सदरची संस्था माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत दैदीप्यमान विजय संपादन केल्यानंतर सभासदांचे हित जोपासले जात आहे. सलग तिसरे वर्ष आहे, सभासदांना 15% डिव्हिडंट दिला जात आहे.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मार्गदर्शक मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी संस्थेचे सचिव जालिंदर साधू वाघमोडे यांनी सभासदांना 15 टक्के डिव्हिडंट जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्षम चेअरमन श्री. उमाजी महादेव बोडरे, व्हाईस चेअरमन श्री. शामराव अर्जुन वाघमोडे, ज्येष्ठ संचालक श्री. खंडुआप्पा पांडुरंग वाघमोडे, श्री. आदेश सोपान वाघमोडे, श्री. आनंदा ज्ञानदेव वाघमोडे, श्री. आनंदा तुकाराम मारकड, श्री. रामदास संभाजी वाघमोडे, श्री. मल्हारी बापू ढोबळे, श्री. दत्तात्रय भानुदास वाघमोडे, श्री. कैलास किसन गोरे, श्री. बाबासो विठ्ठल मोटे, श्रीमती ताराबाई रामदास वाघमोडे, सौ. इंदुमती मारुती वाघमोडे, तज्ञ संचालक श्री. सुनील भालचंद्र पाटील व श्री. जगन्नाथ अनंता शेंडे यांच्यासह संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोंडशिरस पंचक्रोशीत नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंधरा टक्के डिव्हिडंट देणाऱ्या संस्थेमध्ये शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी तामशीदवाडी संस्थेचा डिव्हीडंट देण्यामध्ये हातखंडा आहे. सभासदांनी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील यांच्यावर विश्वास ठेवून संस्थेची निवडणूक दैदीप्यमान मताधिक्याने निवडून देणाऱ्या सभासदांच्या मध्ये सलग तीन वर्ष 15% डिव्हीडंट मिळत असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button