ताज्या बातम्याराजकारण

शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत वेळापूरचे युवा नेते विजयराव माने देशमुख यांचा संघटनेत जाहीर प्रवेश…..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुक्यात धुमधडाक्यात इनकमिंग सुरू..

पंढरपूर (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार शेतकऱ्यांचा पांडुरंग असणारे राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील युवा नेते श्री. विजयराज माने- देशमुख यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आज पंढरपूर येथे मा.खा.राजू शेट्टींच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील, अजित (भैय्या) बोरकर, अमरसिंह माने- देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

विजयराव माने देशमुख यांचे संघटन कौशल्य माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बळकटी निर्माण करणार आहे.

माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजित भैया बोरकर यांची सहकार्याच्या माध्यमातून चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विजयराव माने देशमुख यांच्यासारखी माणसे शेतकरी संघटनेत आल्याने वेळापूर पंचक्रोशीत शेतकरी संघटनेला अच्छे दिन येणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

  1. certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again

Leave a Reply

Back to top button