कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर हलगी निनाद….

चलो माळशिरस..!! चलो माळशिरस..!!

माळशिरस (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्या सहकार्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाला जाग यावी यासाठी, माळशिरस तहसील कार्यालय येथे हलगीचा निनाद करून निवेदन देण्यात येणार आहे. तरी माळशिरस तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव यांनी उपस्थित रहावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा कोरोना, दुष्काळ, मुलांची लग्न, वाढलेले औषधाचे दर यासारख्या महाभयंकर संकटात सापडला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून मायबाप शेतकऱ्याला न्याय द्यावा, या मागणीसाठी माळशिरस नतहसील कार्यालय येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री. अजित (भैय्या) बोरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या ठीक १२ वाजता माळशिरसचे तहसीलदार सो. यांना हलगीच्या निनादात जाग आणून निवेदन देण्यात येणार आहे.

तरी सर्व बहाद्दर शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button