शेतकरी कुटुंबातील विठ्ठल काळे याचे यश तरुणासाठी प्रेरणा देणारे – बाळासाहेब सरगर
कण्हेर (बारामती झटका)
नुकत्याच महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध पदांची भरती करण्यात आली. यामध्ये कण्हेर सरगरवाडी येथील तरुण विठ्ठल मोहन काळे यांनी सी. ई. ए. अर्थात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीटी सी. एस. मार्फत घेण्यात आलेला परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल सरगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सिद्धनाथ मंदिरासमोर भव्य सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. त्याच्यासोबत मंगळवेढ्याचे सचिन बनसोडे यानेही या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्याचाही सन्मान करण्यात आला. तर सामाजिक कामांमध्ये व शैक्षणिक कामांमध्ये सातत्याने पुढे असणारे इंजि. सचिन शेंडगे यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर म्हणाले की, एका शेतकरी कुटुंबातील सर्व सामान्य कुटुंबातील मुलगा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन परीक्षा पास झाल्याने तरुणांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी आहे. कारण, त्याचं प्राथमिक शिक्षण सरगरवाडी या ठिकाणी झालं, माध्यमिक शिक्षण सदाशिव रामाने विद्यालय मानकी व जुनिअर कॉलेजचे शिक्षण दाते प्रशाला नातेपुते तर इंजिनिअरिंग कॉलेज त्याने कर्मयोगी कॉलेज पंढरपूर या ठिकाणी पूर्ण केले. तो नोकरी करण्यासाठी गेली अनेक दिवस परीक्षेचा अभ्यास करत होता. त्यामुळे त्याला आलेले यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अर्जुन पिंजारी, अंकुश शेंडगे, यशराज शेंडगे, अशोक शेंडगे, करण सरगर, नामदेव सरगर, बालाजी काळे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शेंडगे यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This article is fantastic! The perspective you shared is very refreshing. For more details on this topic, visit: DISCOVER MORE. What do others think?