ताज्या बातम्याराजकारण

शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी दोन अजित मधील अंतर कमी केले….

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या दोन लढवय्या युवा नेत्यांमध्ये मनोमिलन

माळशिरस (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका युवा आघाडी अध्यक्ष अजित कोडग यांच्यामध्ये असंतुष्ट लोकांनी वाढवलेले अंतर शेट्टी साहेब यांनी कमी केले.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये निधड्या छातीने काम करणाऱ्या दोन लढवय्या युवा नेत्यांमध्ये मनोमिलन झालेले आहे.

शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब व सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना जोमाने काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलने, उपोषणे करून गोरगरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळावा, यासाठी स्वाभिमानीची फौज अग्रेसर असते. एकमेकांच्या गैरसमजुतीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काही लोकांनी गैरसमज पसरवलेले होते. त्यामुळे संघटनेमध्ये श्रेयवाद सुरू होते.

खासदार राजू शेट्टी यांनी चळवळीमध्ये काम करणाऱ्या दोन लढवय्या युवा नेत्यांचे मनोमिलन केलेले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button